

Rohit Aarya Pune Connection : मुंबईच्या पवई भागात १७ लहान मुलांना ओलिस ठेवणारा आणि पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेला रोहित आर्या हा माणूस कसा होता? हे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे पुण्याशी असलेलं त्यांचं कनेक्शन समोर आलं असून पुण्यात राहत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. जनसत्तानं याबाबत बातमी दिली आहे.
या वृत्तानुसार, रोहित आर्या यांनी पुण्यातील कर्वेनगर भागातील गिरिजा शंकर विहार इथं एक कॅफे सुरु केला होता. भाड्यानं घेतलेल्या एका गाळ्यामध्ये हा कॅफे होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी हा कॅफे सुरु केला त्यानंतर केवळ सहा महिन्यांतच म्हणजेच जून-जुलै महिन्यात त्यांनी हा कॅफे बंद केला होता, अशी माहिती त्यांच्या कॅफेच्या बाजुला असलेल्या दुकानदारांनी सांगितलं. आता त्यांच्या कॅफेच्या जागी एक गॅरेज सुरु आहे.
दुसऱ्या एका दुकानदारानं सांगितलं की, रोहित आर्या हे या कॅफेपासून जवळच राहत होते. एक-दोन वर्षांपूर्वीच ते या ठिकाणी राहायला आला होते. ते अगदीच सामान्य माणूस होते आपण ज्या प्रकारे एकमेकांशी गप्पागोष्टी करतो तसंच ते बोलायचे. तसंच रोहितला ओळखणाऱ्या आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, ते अतिशय शांत आणि संयमी व्यक्ती होते. त्यामुळं त्याच्याबाबत आता जे काही घडलंय असं कधी त्याच्याबाबत होऊ शकतं हे मला आताही खरं वाटत नाहीए. पण त्यांच्याबाबत ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यावरुन शंका उपस्थित होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी मंत्र्यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाची आम्हाला माहिती नव्हती. त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो ही खूपच चांगला होता. त्याचबरोबर रोहित राहत असेलल्या कोथरुडच्या शिवतीर्थ नगर भागातील सोसायटीमधील लोकांनाही त्यांचा एन्काऊंटर झाल्याच्या बातमीनं धक्का बसला आहे. या सोसायटीत रोहितचे वृद्ध आई-वडील राहत होते.
रोहित आर्याचा मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या काही मागण्या केल्या होत्या. त्यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाशी संबंधित शाळेच्या प्रकल्पाचं एक टेंडर त्यांना मिळालं होतं. हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही त्यांना याचे पैसे मिळाले नव्हते, त्यामुळं त्यांनी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलनही केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.