Ashti Assembly Elections 2024: महायुतीत पेच; भाजपच्या सुरेश धसांच्या उमेदवारीला विद्यमान NCP आमदाराचा विरोध; बंडखोरीचा इशारा

Beed Politics News: आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार असले तरी ही जागा भाजपच्या सुरेश धस यांच्यासाठी सोडून त्याऐवजी गेवराईची जागा राष्ट्रवादीकडे घ्यायची अशा सुरुवातीपासून चर्चा आहेत.
Balasaheb Ajabe| Suresh Dhas | Bhimrao Dhonde
Balasaheb Ajabe| Suresh Dhas | Bhimrao DhondeSarkarnama
Published on
Updated on

Beed News: महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एन्ट्रीने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवारींचा मोठा पेच आहे. त्यामुळे बंडखोरी अटळ आहे.

आष्टीत तर महायुतीचे आमदार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार सुरेश धस व भीमराव धोंडे यांच्यात पेच आहे. आता तर बाळासाहेब आजबे यांनी वेळप्रसंगी आपण भाजपच्या भीमराव धोंडेंच्या पाठीशी राहू असे वक्तव्य केले आहे. हा काही महायुतीतला समोपचारपणा नाही तर सुरेश धसांना उमेदवारी मिळाली तर आपली काय भूमिका हे आताच आजबेंनी सांगून टाकलेय.

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप हे पूर्वी राजकीय ताकद असलेले पक्ष होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागर तर भाजपकडून लक्ष्मण व नमिता मुंदडा आमदार आहेत.

मागच्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर संदीप क्षीरसागर वगळता मुंडे, सोळंके व आजबे अजित पवार गटाकडे गेले. आता विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार याचा सुरुवातीपासून पेच आहे.

Balasaheb Ajabe| Suresh Dhas | Bhimrao Dhonde
Bajrang Sonwane: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी जरांगे फॅक्टर चालणार का? खासदार बजरंग सोनवणे म्हणाले,...

पंकजा मुंडे यांना अगोदर लोकसभेची उमेदवारी व नंतर विधान परिषदेवर संधी मिळाल्याने धनंजय मुंडे यांचा उमेदवारीचा मार्ग पुर्ण मोकळा झाला. पण, आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार असले तरी ही जागा भाजपच्या सुरेश धस यांच्यासाठी सोडून त्याऐवजी गेवराईची जागा राष्ट्रवादीकडे घ्यायची अशा सुरुवातीपासून चर्चा आहेत.

त्यामुळेच भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही वेगळा शोधायला सुरुवात केली आहे. इकडे आष्टीत सुरेश धसांनीही जोरदार तयारी चालविली आहे. त्यामुळे आता आजबेंनी थेट भीमराव धोंडे यांना साथ देण्याची भाषा केली आहे.

‘समजा काही खालीवर झालेच तर आपण भीमराव धोंडे यांच्या पाठीशी उभा राहू प्रसंगीतेही माझ्या पाठीशी उभे राहतील’ असे वक्तव्य केले आहे. आपण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली परंतु एक रुपयालाही कधी कुणाचा घेतला नाही.

आष्टीची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे. तसे झाल्यास भीमराव धोंडे माझ्या पाठीशी उभे राहतील. किंवा यात उमेदवाराबाबत काही खाली वरी झाले तर मी धोंडे यांच्या पाठीशी उभा राहणार, असे आजबे म्हणाले.

मागच्या निवडणुकीत भाजपच्या भीमराव धोंडे यांना पराभूत करुन बाळासाहेब आजबे विधानसभेत पोचले. धोंडे तीन वेळा काँगेसकडून तर एकदा भाजपकडून आष्टीचे आमदार राहीले.

सुरेश धस दोनदा भाजपकडून व एकदा राष्ट्रवादीकडून आमदार राहीले. लातूर -उस्मानाबाद-बीड स्थाानिक स्वराज्य संस्थेवरही त्यांनी भाजपकडून प्रतिनिधित्व केले. आता या तीनही नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात बंडखोरी अटळ मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com