Raju Navghare : 10 वर्षे झोपलेली मंडळी जागी झाली, अजितदादांच्या शिलेदाराने साधला निशाणा

Raju Navghare jayprakash dandegaonkar: वसमत मतदारसंघात मागील पाच वर्षात दोन हजार कोटी कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. दोन ट्रक भरून नारळ फोडले आहेत, असे माजी आमदार यांनी स्वतः कबूल केले, असे आमदार राजू नवघरे म्हणाले.
Raju Navghare
Raju Navgharesarkarnama
Published on
Updated on

पंजाब नवघरे

Raju Navghare News : दहा वर्ष झोपलेली काही नेते मंडळी निवडणुका जवळ आल्या की जागी झाली आहेत. एवढे दिवस पूर्णा नदीवरील बंधाऱ्याच्या नावाखाली मते घेणाऱ्या मंडळींना आता मतदारसंघातील जनता आठवत आहे.कोणाच्याही सुख दुःखात सहभागी न होणारे नेते आता आपली माणसं म्हणून मतदारांना भुलवीत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार राजू नवघरे यांनी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आमदार राजू नवघरे यांच्या पुढाकारातून वसमत मतदारसंघात आज ठीक ठिकाणी 300 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडल

'वसमत मतदारसंघात मागील पाच वर्षात दोन हजार कोटी कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. दोन ट्रक भरून नारळ फोडले आहेत, असे माजी आमदार यांनी स्वतः कबूल केले असताना आता तेच विकास काय झाला म्हणून विचारत आहेत.',असा टोला आमदार नवघरे यांनी लगावला.

Raju Navghare
Indapur Politic's : राष्ट्रवादीतील बंड हर्षवर्धन पाटलांच्या आमदारकीच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा ठरणार?

आपल्या आमदारकीच्या काळात दहा कोटी रुपयांपेक्षा एकही रस्त्याचे काम न केलेली नेते मंडळी आता आम्हाला 2 हजार कोटीची विकास कामे करून देखील टीका करत आहेत. कार्यकर्ता मोठा झालेला यांना बघवत नाही. कधीच कोणत्या कार्यकर्त्यांना यांनी मोठे होऊ दिले नाही असा आरोप नवघरे यांनी केला.

विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते.

वसमत येथील शंभर खाटाच्या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम भूमिपूजन शुक्रवारी आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.मंगेश टेहरे आदी उपस्थित होते.

Raju Navghare
Ajit Pawar : रामराजे तुतारी हाती घेणार? अजितदादा म्हणाले, 'त्यांचा निर्णय...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com