Indapur Politic's : राष्ट्रवादीतील बंड हर्षवर्धन पाटलांच्या आमदारकीच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा ठरणार?

Harshvardhan Patil NCP Entry : मागील २०१९ च्या निवडणुकीत हुकलेली आमदारकीची संधी पुन्हा मिळविण्यासाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पण, अवघ्या काही दिवसांतच पाटील यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
Bharat Shah-Appasaheb Jagdale-Harshvardhan Patil-Dashrath Mane
Bharat Shah-Appasaheb Jagdale-Harshvardhan Patil-Dashrath Mane Sarkarnama
Published on
Updated on

Indapur, 11 October : मागील 2019 च्या निवडणुकीत हुकलेली आमदारकीची संधी पुन्हा मिळविण्यासाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पण, अवघ्या काही दिवसांतच पाटील यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख तीन नेत्यांच्या बंडामुळे हर्षवर्धन पाटील यांची विधानसभेतील वाट खडतर बनण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील तीन प्रमुख नेत्यांनी पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध करत बंडाचे निशाण फडकवले आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी आज परिवर्तन मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करूनही हर्षवर्धन पाटील यांची आमदारकीची स्वप्नपूर्ती होणार का, अशी चर्चा या तीन नेत्यांच्या बंडामुळे होत आहे.

राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) इंदापूर मतदारसंघातून उमेदवारीचा शब्दही देण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या तुतारीकडून विधानसभा निवडणूक लढवत पुन्हा एकदा विधिमंडळात जाण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा खटाटोप आहे. मात्र, त्यांच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर व्हायला तयार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.

Bharat Shah-Appasaheb Jagdale-Harshvardhan Patil-Dashrath Mane
Indapur Politic's : आम्ही जेलमध्ये बसू; पण इंदापुरातून विधानसभा लढूच; पवारांच्या निकटवर्तीय नेत्याची घोषणा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दशरथ माने, भरत शहा आणि आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी आज इंदापुरात परिवर्तन मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. याच मेळाव्यात बोलताना सोनाई परिवारचे प्रमुख दशरथ माने यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्ही इंदापूरमधून माघार घेणार नाही. आम्ही अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवू, असे जाहीर आव्हान दिले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील या प्रमुख नेत्याच्या बंडाचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्याने तो फटका माजी मंत्री पाटील यांना बसतो की मागील निवडणुकीत माने हे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासोबत होते, तर आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा हे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत होते, त्यामुळे पाटील यांचेच नुकसान होण्याचा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या आमदारकीच्या वाटेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड अडथळा ठरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Bharat Shah-Appasaheb Jagdale-Harshvardhan Patil-Dashrath Mane
Dashrath Mane : पवारसाहेब नवी खोंडं आणा की हो...असली कशाला घेताय?; हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मानेंचा हल्लाबोल

मेळाव्याला लक्षणीय गर्दी

अवघ्या काही दिवसांत या तीन नेत्यांनी बोलावलेल्या मेळाव्याला झालेली गर्दी इंदापूरचे आजी-माजी आमदारांची झोप उडवणारी होती. इंंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे या मेळाव्याकडे लक्ष होते. त्यामुळे मेळाव्याला झालेल्या गर्दीची इंदापूर मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com