Parli Assembly Constituency : परळीची निवडणुक निर्भय वातावरणात, आयोगाची खंडपीठात हमी

Assembly elections in Parli will be conducted in a fearless atmosphere, Election Commission guarantees in the bench : संवेदनशील मतदान केंद्रांबाबतही 19 जून 2023च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश आहे. एकदा संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित झाल्यानंतर निर्धारित मापदंडानुसार योग्य ती पावले उचलली जातील.
Bombay High Court bench Aurangabad
Bombay High Court bench AurangabadSarkarnama
Published on
Updated on

High Court News : परळी विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्याचे निवडणूक आयोगाचे शपथपत्र खंडपीठात सादर करण्यात आले. ते निवेदन स्वीकारून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी याचिका निकाली काढल्या.

परळी- अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील 233 पैकी (Parli) परळीतील 122 मतदान केंद्रे `अति संवेदनशील` घोषित करावे, अशी विनंती परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार ॲड. माधवराव जाधव आणि राजेभाऊ श्रीराम फड यांनी केली होती. या दाखल केलेल्या याचिकांच्या अनुषंगाने खंडपीठाने 22 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावल्या होत्या.

या बजावलेल्या नोटीसच्या उत्तरादाखल बीडचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी शपथपत्र दाखल करुन परळीच्या निवडणूका निर्भय वातावरणात होतील, अशी हमी शपथपत्राद्वारे दिली आहे. कांबळे यांनी शपथपत्रात म्हटल्यानुसार, भारतीय राज्यघटनेने कलम 324 ते 329 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारानुसार भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुका पार पाडण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Bombay High Court bench Aurangabad
Parli Assembly Election : धनंजय मुंडे डिफेन्स का? धडाकेबाज अन् आक्रमक मुंडे साधेपणाने घालताहेत भावनिक साद

तसेच संवेदनशील मतदान केंद्रांबाबतही 19 जून 2023च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश आहे. एकदा संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित झाल्यानंतर निर्धारित मापदंडानुसार योग्य ती पावले उचलली जातील. (Aurangabad High Court) याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. वसंतराव साळुंके, ॲड. एस. एस. जाधवर, ॲड. एम. व्ही. नागरगोजे आणि भारतीय निवडणूक आयोगातर्फे ॲड. अलोक शर्मा यांनी काम पाहिले.

233 परळी विधानसभा मतदारसंघात 122 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील स्वरूपाचे आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतून हे दिसून आलेले आहे. त्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येऊन सुद्धा त्यावर प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत या सर्व मतदान केंद्रावर बोगस मतदान होण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Bombay High Court bench Aurangabad
High Court News : `पन्नास खोके एकदम ओके` सत्तारांसमोर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवरील गुन्हा रद्द

त्यामुळे या सर्व संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा पुरवली जावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com