Sangeeta Thombare news
Sangeeta Thombare news Sarkarnaam

Sangeeta Thombare: खळबळजनक!भाजपच्या माजी महिला आमदाराच्या गाडीवर हल्ला; केजमध्ये काय घडलं?

BJP Political News : या हल्ल्यात मारलेल्या दगडाने वाहनाची काच फुटली असून माजी आमदार संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.
Published on

Beed News :

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर गुरुवारी(ता.28) ठाकरे गट - आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंं आहे.यातच आता बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

केजच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे घडली. या हल्ल्यात मारलेल्या दगडाने वाहनाची काच फुटली असून माजी आमदार संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे (Sangeeta Thombre) 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने (Bjp) त्यांच्या ऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या तयारी करत आहेत. त्यांनी मतदार संघाचे दौरा करून विविध कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील भेट घेतली होती. त्या बुधवारी तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटोपून परतत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात वाहनाची काच फुटून दगड लागल्याने माजी आमदार संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला नेमका कुणी केला? याची माहिती पोलीस घेत आहेत.

Sangeeta Thombare news
Narayan Rane News : राड्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्हाला....'

त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोणत्या कारणामुळे संगीता ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस तपासानंतरच हा हल्ला कोणी व का केला? हे स्पष्ट होणार आहे.

Sangeeta Thombare news
Aditya Thackeray : "श्रावण आहे नाहीतर..." मालवणमधील राड्यानंतर पावसात भिजत आदित्य ठाकरेंचं धडाकेबाज भाषण, राणेंसह भाजपवर हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com