Jalna Political News : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली आढळून आली आहे. आंदोलकांनी घोषणाबाजी करत टोपेंच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी बँकेत एकत्र आले होते. या बैठकीस राजेश टोपेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी इतर लोकप्रतिनिधींनी लावलेल्या वाहनाच्या ठिकाणीच आपली गाडी पार्क केली होती. बँकेच्या आवारात लावलेल्या टोपेंच्या या गाडीवरच अज्ञातांनी दगडफेक करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तेथे लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली आढळून आली. त्यामुळे टोपे यांना काळे फासण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास होण्याची शक्यता आहे. दगडफेक करण्यापूर्वी घटनास्थळी घोषणाबाजी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हे आंदोलक नेमके कोण होते, याबाबत अद्याप काही खुलासा झालेला नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.