Maratha Protest News : भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

Maratha protestors office attack: मराठा आंदोलक केनेकर यांचे कार्यालय फोडणार याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी करत केनेकर यांच्या कार्यालयाजवळ आले तेव्हा तिथे आधीच बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले.
Bjp Leader Sanjay Kenekar News
Bjp Leader Sanjay Kenekar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Protest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेले विधान भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या चांगलेच अंगलट येणार असे दिसते. `जरांगे पाटील यांनी एकदा आपला डीएनए तपासावा, ते खरचं मराठा आहे का `? असे वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणाऱ्या केनेकर यांच्या संभाजीनगर येथील संपर्क कार्यालयावर आज संतप्त मराठा आंदोलक धडकले.

या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न होता. परंतु आधीच तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखले. (Maratha Reservation) यावेळी या आंदोलकांनी संजय केनेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक 25-30 कार्यकर्ते केनेकर यांच्या कार्यालयाकडे धावत आल्याने एकच गोंधळ उडाला. `मनोज जरांगे पाटील जिंदाबाद, संजय केनेकर मुर्दाबाद`, अशा घोषणा देत आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना रोखताना पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.

दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांना कार्यालयावर चाल करुन जाण्याआधीच रोखले आणि पांगवले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या संजय केनेकर यांच्या संपर्क कार्यालयावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय केणेकर यांनी दोन दिवसापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते.

Bjp Leader Sanjay Kenekar News
Maratha Reservation : "एवढा जातीयवाद कशासाठी?" महायुती सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन जरांगे पाटलांचा संतप्त सवाल

सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे यांनी एकदा स्वतःचा डीएनए तपासावा, खरचं ते मराठा आहेत का? असे विधान केणेकर यांनी केले होते. यावरून मराठा आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण होते. (BJP) आज दुपारी क्रांती चौकातील केणेकर यांच्या संपर्क कार्यालयावर पंचवीस ते तीस मराठा कार्यकर्ते धडकले आणि त्यांनी कार्यालयाची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखून धरले.

परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी या आंदोलकांना संजय केणेकर यांच्या कार्यालयापासून लांब नेले आणि पांगवले. त्यामुळे घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्ते माघारी फिरले. केनेकर यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. तर पोलिसांनी या कार्यालयावर बंदोबस्त वाढवला असून दंगा काबू पथक तैनात केले आहे.

Bjp Leader Sanjay Kenekar News
BJP Vs Congress: भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसवर मोठी नामुष्की, थेट ट्विट डिलीट करण्याची आली वेळ; 'हे' आहे कारण

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच संजय केनेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून वादग्रस्त विधान केल्याने त्यात अधिक भर पडली. गेल्या दोन दिवसापासून केनेकर यांच्या विरोधात मराठा तरुण आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. अचानक 25 ते 30 कार्यकर्त्यांनी क्रांती चौक येथील संजय केनेकर यांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.

मराठा आंदोलक केनेकर यांचे कार्यालय फोडणार याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी करत केनेकर यांच्या कार्यालयाजवळ आले तेव्हा तिथे आधीच बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी संजय केनेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथून हुसकावले आणि केनेकर यांच्या कार्यालयासमोर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com