Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या मंत्रीपदाच्या काळात संभाजीनगरच्या `डीएमआयसी` मध्ये चार मोठे प्रकल्प आले. एक उद्योजक म्हणून मला याचा आनंद आहे. माझ्या मंत्रीपदाच्या काळात आतापर्यंत 52 हजार कोटींचे उद्योग आले आहेत. आणखी पन्नास हजार कोटींचे उद्योग या शहरात येणार आहेत, याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगत मंत्री अतुल सावे यांनी समाधान व्यक्त केले.
ज्या संभाजीगरात मी लहानचा मोठा झालो, त्या शहराचा, जिल्ह्याचा, भागाचा विकास झाला पाहिजे, ही माझी तळमळ असल्याचे सावे म्हणाले. (Atul Save) औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे तिसऱ्यांदा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. प्रचारा दरम्यान, केलेली विकास कामे हाच आपला प्रमुख मुद्दा असून त्या आधारावरच आपण जनतेसमोर जात आहोत, असे सावे सांगतात.
संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रामध्ये डीएमआयसी हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नावारुपाला आला आहे. माझ्या मंत्री पदाच्या कार्यकाळात चार मोठे प्रकल्प डीएमआयसीमध्ये आले. त्यासाठी पाठपुरावा केला, इतका की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला `सावे तुम्ही उद्योजक आहात, तुमची तळमळ मला कळते` असे गौरवोद्दगार काढले होते. पण ज्या शहरात माझे लहानपण गेले, मी मोठा झालो, त्या भागाचा विकास झाला पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे.
यातूनच आतापर्यंत 52 हजार कोटींचे उद्योग संभाजीनगरमध्ये आले आहेत. भविष्यात अजून 50 हजार कोटींचे उद्योग लवकरच सुरू होणार आहे. जवळपास एक लाख कोटींचे उद्योग इथे आल्याने तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सावे यांनी म्हटले आहे. (BJP) सुरक्षित भविष्यासाठी लढतोय. `एकजुटीने` माझ्या पाठीशी राहा असे आवाहन सावे मतदारांना करत आहेत.
गेल्या काही वर्षात आपण मूलभूत सुविधांमध्ये सक्षम बदल केले. आता विकासाच्या पुढील टप्प्याकडे आपण वाटचाल करत आहोत. येत्या काळात विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आधुनिक शिक्षण, सुसज्ज तंत्रज्ञान व्यवस्था, आयटी पार्क, शाश्वत पर्यावरण, आरोग्य सुविधा आणि क्रीडा क्षेत्रात नवनवीन संधी अशा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून विकास साध्य करायचा आहे. आपली साथ नक्कीच मिळेल हा विश्वास सावे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.