Aurangabad East Assembly: पूर्वमध्ये एमआयएमची खेळी वंचितने उलटवली का ?

Vanchit Bahujan Aghadi and MIM: लोकसभा निवडणुकीत वंचितने सुरुवातीला अशीच खेळी केली होती. वंचितने आपल्याला उमेदवारी नाकारली आहे, त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे माध्यमांना सांगत दिशाभूल केली होती. नंतर एबी फाॅर्म जोडत अफसर खान वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले होते.
AIMIM- Vanchit Aghadi News
AIMIM- Vanchit Aghadi NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदरासंघामध्ये एमआयएमने शेवटच्या क्षणाला माजी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली. गफ्फार कादरी यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इम्तियाज जलील आपला हक्काचा मध्य मतदारसंघ सोडून पूर्व मध्ये उतरले. एमआयएमची ही खेळी यशस्वी ठरणार असे वाटत असतांनाच वंचित बहुजन आघाडीने ती उलटवण्यासाठी नवा डाव तातडीने टाकला.

विकास दांडगे यांची आधी जाहीर केलेली उमेदवारी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या पूर्वमधील एन्ट्रीनंतर वंचितने बदलली. लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्याविरोधात लढलेले अफसर खान यांना पूर्व मधून उमेदवारी देण्यात आली. वंचितच्या या खेळीनंतर पूर्व मध्ये दुसरा मुस्लिम उमेदवार मैदानात उतरला. लोकसभा निवडणुकीत वंचितने सुरुवातीला अशीच खेळी केली होती.

वंचितने आपल्याला उमेदवारी नाकारली आहे, त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे माध्यमांना सांगत दिशाभूल केली होती. नंतर एबी फाॅर्म जोडत अफसर खान वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले होते. या निवडणुकीत महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झाले. तर एमआयएमचे इम्तियाज जलील हे 3 लाख 41 हजार 480 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर होते.

AIMIM- Vanchit Aghadi News
Imtiaz Jaleel News : `नांदेड से हमारा पुराना कनेक्शन`, इम्तियाज जलील पोटनिवडणुक लढणार!

अफसर खान यांनी वंचितकडून निवडणुक लढतांना 69 हजार 266 मते घेतली होती. लोकसभेला एकमेकांविरोधात लढलेले इम्तियाज जलील आणि अफसर खान विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पूर्वमध्ये लढणार आहेत. (Vanchit Bahujan Aghadi) वंचितने अफसर खान यांना उमेदवारी देत इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

एकीकडे एमआयएमला सोडून बाहेर पडलेले आणि समाजवादी पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केलेले गफ्फार कादरी हे दुखावलेले गेले आहेत. पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांच्या घुसखोरीला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा कादरी यांचा प्रयत्न असणार आहे. विजय मिळाला नाही तरी एमआयएमचा खेळ बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मुंबईत कादरी यांना पक्षाचा एबी फाॅर्म दिला होता. परंतु समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने परस्पर जागा जाहीर केल्यामुळे सपा आणि काँग्रेसमध्ये वादावादी झाली.

AIMIM- Vanchit Aghadi News
Aurangabad East Assembly: औरंगाबाद पूर्वमध्ये काँग्रेसने चेहरा बदलला, निकाल बदलणार का?

त्यानंतर अबू आझमी यांनी कादरी यांच्या उमेदवारीला कात्री लावली. आधी काँग्रेस, मग सपाकडून उमेदवारीचे प्रयत्न फसल्यानंतर आता ते अपक्ष लढत आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यांतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी मात्र गनिमी काव्याचा दावा करत विरोधकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता त्यांचा हा इशारा वंचित, अपक्ष कादरी आणि मंत्री अतुल सावे किती गांभीर्याने घेतात ? हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com