Aurangabad : भाजपचे मिशन लोकसभा, नड्डा, फडणवीसांची २ जानेवारीला सभा..

Bjp : या जाहीर सेभेतूनच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला जाणार आहे.
Bjp Rally In Aurangabad News
Bjp Rally In Aurangabad NewsSarkarnama

Marathwada News : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा केल्यानंतर (Bjp) भाजपने आता मिशन लोकसभा हाती घेतले आहे. राज्यातील सत्तातंरानंतर महाराष्ट्रातील अशा अनेक लोकसभा मतदारसंघात भाजप पहिल्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, जिथे त्यांना युतीमुळे कधीच लढता आले नव्हते. औरंगाबाद, परभणी, हिंगोली या मतदारसंघावर भाजपचा डोळा असून या ठिकाणच्या लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Bjp Rally In Aurangabad News
Imtiaz Jalil : माजीमंत्री देसाईंकडून कोट्यावधींचा औद्योगिक जमीन घोटाळा...

भाजपच्या लोकसभा मिशनची सुरूवात नव्या वर्षात औरंगाबादपासून होते आहे. येत्या २ जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा, पदाधिकाऱ्यांची बैठक (Aurangabad) औरंगाबादेत होणार आहे. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ही माहिती दिली. जे. पी. नड्डा हे नव्या वर्षात औरंगाबादेत येत असून (Marathwada) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.

सायंकाळी होणाऱ्या या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांची देखील उपस्थिती असणार आहे. या जाहीर सेभेतूनच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला जाणार आहे. या शिवाय आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणनिती देखील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरवली जाणार आहे.

शिवसेना-भाजप युतीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा गेल्या ३०-३५ वर्षापासून शिवसेनेकडे आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने या लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले. आता राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा भाजपने लढवण्याचा निर्धार केल्याचे दिसते.

या शिवाय परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघावर देखील भाजपकडून दावा केला जावू शकतो. या दोन्ही जिल्ह्याचे प्रभारी असलेल्या डाॅ. कराड यांनी या संदर्भात आपण आतापर्यंत न लढवलेल्या या दोन्ही मतदारसंघात लढणार आहोत, असे विधान केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com