Aurangabad Crime : एसीपी ढुमेंना निलंबित करा, अन्यथा शहर बंदची हाक..

Aimim : इम्तियाज यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी बोलून या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
Acp Dhume News, Aurangabad
Acp Dhume News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : महिलेची छेड आणि विनयभंग केल्याप्रकरणी सध्या जामीनावर असलेल्या एसीपी विशाल ढुमे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शहर बंद ठेवून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढू, असा इशारा (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. कलंकित सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) विशाल धुमे यांना निलंबित न केल्यास शुक्रवारी शहरात बंद पाळण्याचा इशारा एमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे.

Acp Dhume News, Aurangabad
30-30 Scam : शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राठोडने भावाच्या साखरपुड्यात वाटल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू..

तसेच पोलिस आयुक्त कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नागेश्वरवाडी येथील पीडितेच्या घरी भेट दिली. (Aurangabad) एवढा गंभीर गुन्हा करूनही त्याला जामीन कसा मिळू शकला, असा सवालही ते करत असून, शहर पोलिस ठाण्याच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी बोलून या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलीस दलाचे नाव बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास शुक्रवारी सर्व राजकीय/सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन बंद पाळतील आणि क्रांतीचौक ते मिल कॉर्नरवरील सीपी कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील, अशी माहिती त्यांनी डीजींना दिली.

बुधवारपर्यंत आरोपी अधिकाऱ्यावर आणखी काही कठोर कलमे लावायला हवी होती, असेही ते म्हणाले. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी देखील ढुमे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. जैस्वाल यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेवून या संदर्भातील निवदेन देखील दिले आहे. पडित महिला ही जैस्वाल यांच्या संपर्क कार्यालय असलेल्या नारळीबाग परिसरात राहते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com