Aurangabad District Bank : जिल्हा बँकेतील जागा वाटपावरून महायुतीत तानातानी; इच्छूकांचा जीव टांगणीला!

Aurangabad District Bank Election : राज्य पातळीवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीत महायुती एकत्र लढेल असे जाहीर केले आहे. स्थानिक पातळीवर मात्र जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम राहावे, असे प्रयत्न मंत्री अतुल सावे व भाजपचे इतर नेते करताना दिसत आहेत.
Aurangabad DCC Bank Election
Aurangabad DCC Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad District Bank News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून तानातानी सुरू आहे. जिल्हा परिषद, महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून आता जिल्हा बँकेतही तोच पॅटर्न राबवण्याचा विचार आहे.

राज्य पातळीवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीत महायुती एकत्र लढेल असे जाहीर केले आहे. स्थानिक पातळीवर मात्र जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम राहावे, असे प्रयत्न मंत्री अतुल सावे व भाजपचे इतर नेते करताना दिसत आहेत.

४ जुलै रोजी मतदान होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 23 जून ही उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या बँकेत अध्यक्षपद आणि सहा संचालक असावेत, असा आग्रह शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आहे.

पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडणुकीत अनेक नवे चेहरे मैदानात उतरले आहेत. यात शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांचा समावेश आहे. तर भाजपाकडून मंत्री अतुल सावे, शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा बँकेत महायुतीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्यात या संदर्भात स्वतंत्र बैठक अद्यापही झालेली नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच जिल्हा बँकेतील जागा वाटपाला व चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, महापालिकेप्रमाणेच जिल्हा बँकेच्या जागा वाटपातही भाजपची सरशी होणार? की शिवसेना त्यांच्यावर कुरघोडी करणार? हे 23 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

एकूण 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र, यात वैयक्तिक सभासद मतदारसंघातून एकमेव अब्दुल जावेद अब्दुल वाजेद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे ही जागा आता रिक्त राहील. त्यामुळे याही वेळी संचालक मंडळ हे 20 जणांचेच असेल. पैकी प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्था पैठणमधून एकमेव आमदार विलास भुमरे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे.

त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे. यामुळे 19 जागांसाठी ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रविवारी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आलेल्या स्थानिक नेत्यांनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी जिल्हा बँक निवडणुकीतही एकत्रित लढणार असल्याचे संकेत दिले. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. स्थानिक पातळीवर ग्रामीण मतांवर शिवसेनेची अधिक पकड आहे. तर राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे जागा वाटपात कोण मोठा भाऊ ठरेल? याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.

Aurangabad DCC Bank Election
Kalpana Kharat Bail: औरंगाबाद कोर्टाचा अशोक खरातच्या फरार पत्नीला मोठा दणका, जामीन फेटाळला; अटकेची टांगती तलवार

सत्तारांचे वेट अॅण्ड वॉच

मागील काही वर्षांपासून आमदार अब्दुल सत्तार यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळेच त्यांनी यावेळी पुत्र अब्दुल समीर सत्तार यांनी निवडणुकीत उतरवले होते. मात्र अर्ज छाननीत ते बाद झाल्याने सत्तारांना मोठा धक्का बसला. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट देखील आला आहे.

सत्तार आणि आमदार संजना जाधव यांच्यासह 9 जणांनी दाखल केलेल्या अपिलांवरील उद्या (ता. 17) च्या सुनावणीनंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. समीर सत्तार यांचा अर्ज उडाला तर अब्दुल सत्तार काय भूमिका घेतात? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे 23 जूनच्या आधी याबाबतचा निर्णय महायुतीच्या नेत्यांना जाहीर करावा लागणार आहे.

Aurangabad DCC Bank Election
Vedant Bandgar Case: वेदांत बंडगर हत्येप्रकरणात हादरवणारी अपडेट, फरार संशयित आरोपीनं केलं विष प्राशन; रुग्णालयात उपचार सुरू

उमेदवारी मागे घेण्यावरून तिन्ही पक्षात अंतर्गत राजकारण पेटण्याची शक्यता आहे. महायुती झाल्यास महायुतीविरोधात महाआघाडी असे दोन पॅनल या निवडणुकीत लढतील. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीच्या अर्ज छाननीत 45 उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवले.

या निर्णयाविरोधात 9 उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे 10 अपिल दाखल करत आव्हान दिले आहे. या सर्व अपिलांवर उद्या विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे. अपिल दाखल केलेल्यांमध्ये आमदार संजना जाधव, सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर सत्तार यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com