Kalpana Kharat Bail: औरंगाबाद कोर्टाचा अशोक खरातच्या फरार पत्नीला मोठा दणका, जामीन फेटाळला; अटकेची टांगती तलवार

Ashok Kharat wife anticipatory bail denied: कल्पना खरात भोंदू अशोक खरात याची पत्नी आहे. शिर्डी परिसरातील जमीन फसवणूक व बेकायदेशीर सावकारी प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात 2023 पासून हे प्रकरण सुरू आहे.
Kalpana Kharat bail rejected by Aurangabad court
Kalpana Kharat bail rejected by Aurangabad courtSarkarnama
Published on
Updated on

Kalpana Kharat cheating case investigation: माहिती दडवून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर सावकारीच्या गंभीर गुन्ह्यात सकृतदर्शनी सहभाग आढळल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संशयित आरोपी महिला कल्पना अशोककुमार खरात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी फेटाळून लावला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपी महिलेचा गुन्ह्यात थेट संबंध असल्याचे बँक खात्यावरील व्यवहारांवरून आणि स्वाक्षरीवरून सिद्ध होत असल्याने त्यांची कोठडीत घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. महिलेने सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी आपल्याला या खरेदीखताच्या व्यवहाराची कोणतीही माहिती नसल्याचा खोटा दावा केला होता.

मात्र, तपासात त्यांच्या दाव्याचा खोटारडेपणा उघड झाला. माहिती दडवून न्यायालयाची दिशाभूल केल्याच्या या एकाच कारणावर बोट ठेवून न्यायालयाने अर्ज फेटाळला. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

कोण आहे कल्पना खरात?

कल्पना खरात भोंदू अशोक खरात याची पत्नी आहे. शिर्डी परिसरातील जमीन फसवणूक व बेकायदेशीर सावकारी प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात 2023 पासून हे प्रकरण सुरू आहे.

Kalpana Kharat bail rejected by Aurangabad court
Maharashtra IAS News: फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठी उलथापालथ; 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

फिर्यादीने अशोक खरात याच्याकडून 3 कोटी रुपये 2% मासिक व्याजाने कर्ज घेतले होते. कर्जाच्या हमीपोटी फिर्यादीच्या शेतीचे खरेदीखत कल्पना खरात हिच्या नावावर करून घेतले होते. फिर्यादीने मुद्दल आणि व्याजाची पूर्ण रक्कम परत केली. पैसे परत मिळूनही आरोपींनी जमीन परत केली नाही. फिर्यादीची फसवणूक झाली.यावरून शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र सावकारकी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात एकूण 5 जण आरोपी आहेत. पोलिस आणि सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार 23 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या 85 लाखांच्या व्यवहारात कल्पना खरात हिचे नाव आहे. फिर्यादीच्या शेतीचे खरेदीखत तिच्याच नावावर झाले आहे. तपासात पोलिसांनी विशेष मुखत्यारपत्र आणि खरेदीखत जप्त केले आहे.

Kalpana Kharat bail rejected by Aurangabad court
Pune News: आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का,भाजपच्या जवळ असलेल्या नगरसेवकाचे पद जाणार? पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडलं

सरकारी वकील ए. बी. गिरासे यांच्या म्हणण्यानुसार या कागदपत्रांवरून कल्पना खरात हिला व्यवहाराची पूर्ण माहिती होती आणि त्या त्यात सहभागही असल्याचे हे सिद्ध होते. बँक नोंदींमध्ये 85 लाख रुपयांच्या व्यवहाराचा तपशील आहे, ज्यातून तिचा सहभाग दिसतो.

फसवणूक, पैसे परत मिळूनही जमीन परत न करणे, बेकायदेशीर सावकारी करत 2% मासिक व्याजाने म्हणजे 24% वार्षिक व्याजाने कर्ज देणे, महाराष्ट्र सावकारकी कायद्यात परवानगीशिवाय सावकारी करणे गुन्हा असताना तो केल्याचा कल्पना खरातवर आरोप आहे.

मुख्य आरोपी अशोक खरात यांच्यासोबत कट करून जमीन हडप करणे असे आरोप असताना कल्पना खरात हिने अटकपूर्व जामीन मागितला होता. या संपूर्ण आर्थिक व्यवहारात माझा कोणताही थेट सहभाग नव्हता. मी केवळ मुख्य आरोपीची पत्नी असल्यामुळे मला या गुन्ह्यात गोवण्यात आले. 23 ऑगस्ट 2023 च्या व्यवहारात मी उपस्थितही नव्हते, असा युक्तीवाद तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com