Aurangabad : दसरा मेळावा शिंदेंचा, शक्तिप्रदर्शन सत्तारांचे

पन्नासहुन अधिक खाजगी बसेस आणि छोट्या मोठ्या वाहनांची संख्या एक हजारांवर गेल्याचा दावा सत्तारांनी केला. उद्या पहाटे तीन ते चार च्या सुमारास 25 ते 30 हजार कार्यकर्ते बीकेसीवर दाखल होतील. (Abdul Sattar)
Eknath Shinde Dasara Melawa News, Aurangabad
Eknath Shinde Dasara Melawa News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : उद्या मुंबईच्या बीकेसी मैदानावर होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती असा होणार असल्याचा दावा शिंदे सेनेतील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. दसरा मेळावा शिंदेंचा (Eknath Shinde) असला तरी या निमित्ताने पुन्हा एकदा अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करणार असेच दिसते.

बीकेसीवरील मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे टार्गेट शिंदे सेनेच्या प्रत्येक मंत्री आणि आमदाराला देण्यात आले आहे. (Mumbai) पण या सगळ्यांमध्ये बाजी मारली ती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच. सभा, मेळावे गाजवणे आणि त्याला गर्दी जमवणे यात सत्तारांचा हातखंडा आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मराठवाडा आणि त्यातही अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी सत्तार यांचे नियोजन आणि औरंगाबादच्या हर्सूल ते सिल्लोडपर्यंत झालेल्या स्वागतामुळे शिंदे भारावून गेले होते.

त्यामुळे मुंबईतील दसरा मेळाव्याला मराठवाड्यातून गर्दी जमवण्याचे शिवधनुष्य त्यांनी सत्तार यांच्याच हाती सोपवले होते. आज दुपारी सत्तार यांनी परिवहन मंडळाच्या एसटी बसेस व खाजगी वाहने मिळून जवळपास हजार वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना केला आहे. पाचशे बसेसची मागणी सत्तारांकडून करण्यात आली होती. परंतु त्यांना दुपारपर्यंत ३५० बस मिळाल्या होत्या.

त्यामुळे पन्नासहुन अधिक खाजगी बसेस आणि छोट्या मोठ्या वाहनांची संख्या एक हजारांवर गेल्याचा दावा सत्तारांनी केला. उद्या पहाटे तीन ते चार च्या सुमारास 25 ते 30 हजार कार्यकर्ते घेऊन आपण बीकेसी मैदानावर दाखल होणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde Dasara Melawa News, Aurangabad
Imtiaz Jalil : जिल्ह्यातील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचे तुम्ही सोपवलेले काम प्रामाणिकपणे करणार..

एकीकडे मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी सत्तारांकडून मोठी तयारी केली जात असली तरी जिल्ह्यातील दुसरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातून मुंबईत किती कार्यकर्ते जाणार हे मात्र समजू शकले नव्हते.

तर नाराज असलेले आमदार संजय शिरसाट, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या बाबतीतही मेळाव्या संदर्भातील नियोजन काय आहे? हे समजू शकलेले नाही. त्यामुळे तूर्तास तरी मराठवाड्यातून शिंदेंच्या मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याच्या आव्हानात सर्वाधिक वाटा हा अब्दुल सत्तार यांनीच उचलल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com