divisional commissioner News, Aurangabad
divisional commissioner News, AurangabadSarkarnama

Aurangabad : आधी शिक्षकांच्या परीक्षा, आता विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलींचे आयोजन

Sunil Kendrekar : अहवाल विभागीय आयुक्तालयास ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्यास देखील केंद्रेकर यांनी सांगितले आहे.
Published on

Marathwada : विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, निसर्गाच्या सानिध्यात राहून शिकण्याची संधी मिळावी, निसर्गात बागडता यावे, पक्षी, प्राणी, फळे, फुले, झाडे, वेली यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी. विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने औरंगाबाद विभागातील शाळांनी निसर्ग सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन (divisional commissioner) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे.

divisional commissioner News, Aurangabad
Sanjay Shirsat : तोंडावर साहेब म्हणणारे राऊत, उद्धवला काय कळते असं म्हणायचे..

निसर्ग सहलीचे आयोजन करत असतांना सहल ही निसर्गरम्य परिसरामध्ये आयोजित करावी. निसर्ग सहलीतून विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी, फळे, फुले, विविध वनस्पती, डोंगर, नद्या, टेकड्या त्यांची वैशिष्ट्ये इत्यादीची माहिती मिळू शकेल. (Aurangabad) सहली दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांनी बघितलेल्या प्राणी, फुलपाखरू, पक्षी, पाने, फुले, फळे, डोंगर, नद्या इत्यादीचे टिपण घेण्यास सांगावे. (Marathwada) शक्य असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बिया, पाने, फळे, फुले इत्यादीचे नमुने गोळा करण्यास सांगावे.

निसर्ग सहलीचे आयोजन १६ ते २१ जानेवारी २०२३ या दरम्यान करावे. निसर्ग सहल पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून सहलीचा अहवाल लिहून घ्यावा. निसर्ग सहली दरम्यान विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद अनुभव द्यावा. सहली दरम्यान भेट दिलेल्या जागेचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पटवून द्यावे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी छोट्या कविता, गाणे, गोष्टी, कथा, नकला इत्यादीचे आयोजन करावे. सहली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घ्यावी.

सहल शक्यतो शाळेपासून जवळ असलेल्या निसर्गरम्य परिसरात आयोजित करावी. सहली दरम्यान अनुभवत असलेल्या विविध गोष्टींचे ज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करुन द्यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काही निवडक निसर्ग सहलींना भेटी देऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना देखील केंद्रेकरांनी केल्या. निसर्ग सहलींचा अहवाल शाळांनी काही निवडक छायाचित्रांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयास व गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा.

शिक्षणाधिकारी यांनी अहवाल निवडक छायाचित्रांसह विभागीय आयुक्तालयास ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्यास देखील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. केंद्रकारांनी यापुर्वी शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याची चर्चा सुरू असतांनाच आता त्यांनी निसर्ग सहलीचे आयोजन करण्याचा नवीन प्रयोग केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com