Aurangabad Commissioner News: सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर मराठवाडा विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे देण्यात आला होता. आज शासनाने मृद व जलसंधारण आयुक्त औरंगाबाद यांची मराठवाडा विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
अपर उपसचिव नितीन गद्रे यांनी या संदर्भातील आदेश काढले असून आर्दड यांना तात्काळ विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. (commissioner) दरम्यान, मृद व जलसंधारण आयुक्त औरंगाबाद (Aurangabad) पदाचा अतिरिक्त कार्यभार तुर्तास त्यांनीच सांभाळावा असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रेकर यांनी २४ व २६ मे रोजी शासनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यास २७ जून २०२३ रोजी मंजुरी देण्यात आली होती. (Marathwada) ३ जुलै रोजी भारतीय प्रशासन सेवेतून केंद्रेकर स्वेच्छेने निवृत्त झाले. त्यानंतर विभागीय आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे देण्यात आला होता.
मधुकरराजे आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या राजाटाकळी येथील असून औरंगाबाद येथे यापुर्वी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर मृद व जलसंधारण औरंगाबद विभागाचे आयुक्त म्हणून त्यांना बढती देण्यात आली होती.
आता औरंगाबाद विभागीय आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर २८ जुलैपर्यंत नव्या आयुक्तांची नेमणूक करा, असे निर्देश खंडपीठाने दिले होते. तत्पुर्वीच शासनाने आर्दड यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.