Aurangabad News : महाविकास आघाडीचा जोर, ठाकरेंची शिवसेनाही जिल्ह्यात कमबॅक करणार..

Mahavikas Aghadi विधान परिषदेच्या निवडणुकीत यशाने या तिन्ही पक्षांना पुन्हा एकदा जवळ आणले आहे.
Mahavikas Aghadi News, Aurangabad
Mahavikas Aghadi News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शिंदेंनी केल्या बंडाचा सर्वाधिक फटका बसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांना (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीची साथ देखील मिळत आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या ४० गद्दारांना पुन्हा निवडून येवू देणार नाही, असा निर्धार ठाकरे सेनेने केला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काॅंग्रेसची देखील भक्कम साथ ठाकरे गटाला मिळतांना दिसत आहे.

Mahavikas Aghadi News, Aurangabad
Ranajagjeetsinh Patil News : राणा पाटलांनी पालकमंत्र्यांची तक्रार थेट प्रधान सचिवांकडे केली..

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी झाले. (Aurangabad) हा विजय महाविकास आघाडीला बुस्टर डोस देणार ठरत आहे. काळे यांच्या विजयासाठी (Shivsena) शिवसेनेने बरीच मेहनत घेतली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काळेंसाठी शिवसेनेची यंत्रणा कामाला लावली होती.

त्यामुळे नाराजी, बंडखोरी आणि मराठवाडा शिक्षक संघटनांकडून तगडा विरोध होवून देखील काळेंची नाव तरली होती. याची परतफेड राष्ट्रवादीने गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवशाही विकास पॅनलला मदत करत केली. तीन टर्म आमदार असलेल्या भाजपच्या प्रशांत बंब यांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.

शिवशाहीचे सगळे उमेदवार निवडून आल्याने बंब यांना महाविकास आघाडीने जोरदार दणका दिला. त्याआधी राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पैठणमध्ये संदीपान भुमरे तर वैजापूरात आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात मेळावे घेत ठाकरे गटाला एकप्रकारे मदत केली. अर्थात माजी आमदार चिकटगांवकर पक्ष सोडून गेले, त्यामुळे पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी देखील पवारांचा हा दौरा महत्वाचा होता.

पैठण मतदारसंघात पवारांनी ज्या आक्रमकपणे भुमरे यांच्यावर हल्ला चढवला ते पाहता शिवसेना-राष्ट्रवादीने बंडखोर ४० आमदारांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली असल्याचे स्पष्ट होते. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार मैदानात उतरले आहेत. राज्यातील सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला की काय? असे चित्र होते.

Mahavikas Aghadi News, Aurangabad
Prashant Bamb : बंब यांनी शरद पवारांचे नाव घेतल्याने राष्ट्रवादी आक्रमक, धडा शिकवणार..

परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीत एकत्रित प्रयत्नांना मिळालेल्या यशाने या तिन्ही पक्षांना पुन्हा एकदा जवळ आणले आहे. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे भगदाड पडले. जिल्ह्यातील पाच आमदार फुटल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. परंतु आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद, सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा आणि आता राष्ट्रवादीच्या अजित पवारांची त्यांना मिळालेली साथ यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी जिल्ह्यात अधिक मजबुत होत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com