Aurangabad : आता चांगल्या पोस्ट फिरीवं, मिरच्या झोंबल्या पाहिजे.. भुमरेंचा काॅल व्हायरल..

बंड यशस्वी होऊन शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांच्या अंगात देखील चांगलेच बळ आले आहे. संदीपान भुमरे यांची या बंडात महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. ( Mla Sandipan Bhumre)
Ex. Minister Sandipan Bhumre
Ex. Minister Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री राहिलेले आणि आता शिंदे गटातील बंडखोर अशी टीका होत असलेले संदीपान भुमरे यांचा एक आॅडिओ काॅल सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (Paithan) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर एका कार्यकर्त्याने भुमरे यांचे अभिनंदन करण्यासाठी केलेला हा फोन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या फोन काॅलमध्ये आपल्या समर्थकांला `आता चांगल्या पोस्ट टाक, सगळीकडे फिरिवं, मिरच्या झोंबल्या पाहिजेत`, असं त्या कार्यकर्त्याला म्हणतातांना दिसत आहे. (Aurangabad) हा आॅडिओ काॅल व्हायरल झाल्यानंतर भुमरे संमर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मिडियावर वाॅर सुरू झाले आहे. (Shivsena) सोशल मिडियाचे फायदे तितके तोटे देखील आहेत, याचा सर्वाधिक फटका हा राजकारण्यांना बसतो आहे.

ज्या सोशल मिडियावर राजकीय पुढारी समर्थकांकडून आपला उदोउदो करून घेतात, त्याच सोशल मिडियावर नको त्या गोष्टी व्हायरल झाल्या की त्याचा डोक्याला तापही होतो. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये हिरारीने भाग घेणारे आणि दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आशा बाळगून असलेले संदीपान भुमेर जिल्ह्यात आणि मतदारसंघात टीकेचे धनी ठरले होते. पाचवेळा आमदार, मंत्री असूनही त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.

बंड यशस्वी होते की नाही? याची भिती भुमरे यांच्यासह इतर आमदार, मंत्र्यांना देखील होती. परंतु भाजपच्या राजकीय खेळीने केवळ बंड यशस्वीच झाले नाही, तर उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाचीच लाॅटरी लागली. त्यामुळे शिंदे गटातील बंडखोरांनी गोव्याच्या हाॅटेलात टेबलवर चढून जल्लोष केला होता.

Ex. Minister Sandipan Bhumre
फडणवीसांनी पूजा करावी अशी विठ्ठलाची इच्छा नव्हती: अमोल मिटकरींनी डिवचलं..

बंड यशस्वी होऊन शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांच्या अंगात देखील चांगलेच बळ आले आहे. संदीपान भुमरे यांची या बंडात महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संकट टळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भुमरे चांगलेच आक्रमक झाले. गेल्या आठवडाभरापासून शिवसेना आणि मतदारसंघातून होणारी टीका, निदर्शने, गद्दार अशी विशेषणे यामुळे भुमरे चांगलेच संतापले होते.

आता आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर द्या, असेच त्यांना या कार्यकर्त्याला सांगयचे होते. अभिनंदन करण्यासाठी फोन केलेल्या कार्यकर्त्याला आपल्या खास शैलीत भुमरे यांनी सोशल मिडियांवर आता चांगल्या, भारी पोस्ट सोडा, विरोधकांना मिरच्या झोंबल्या पाहिजे, असा खास आग्रह देखील त्यांनी या कार्यकर्त्याकडे केला. त्यांचा हा फोन काॅल सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com