Aurangabad : सत्तार भाई - इम्तियाज भाई यांचे `मिले सुर मेरा तुम्हारा`..

सत्तार-इम्तियाज यांच्या या एकमेकांच्या कौतुकाने शिवसेनेत मात्र याचे पडसाद नजीकच्या काळात उमटल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.
Mp Imtiaz Jalil-Abdul Sattar
Mp Imtiaz Jalil-Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या विधानानी खळबळ उडवून देणाऱ्या दोन नेत्यांची चर्चा सध्या चांगलीच रंगतेय. एक शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) तर दुसरे आहेत एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील. (Imtiaz Jalil) सध्या राजकारणातील या दोन भाईंची गट्टी चांगलीच जमतांना दिसते आहे. (Aurangabad)

वैजापूर मधील एका कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर आले होते. एकाच व्यासपीठावर येण्याची त्यांची काही ही पहिलीच वेळ नाही. पण जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा उपस्थितांसाठी ते मेजवाणी असते. कारण टोलेबाजी आणि गौप्यस्फोट करण्यात दोघेही पटाईत आहेत.

वैजापूरच्या कार्यक्रमात देखील सत्तार आणि इम्तियाज जलील यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. ऐरवी राजकीय व्यासपाठीवर एकमेकांना कायम पाण्यात पाहणारे हे दोघेही वैजापूरच्या एका खाजगी कार्यक्रमात मात्र चांगलेच खुलले होते. माझ्या खासदार होण्यात अब्दुल सत्तार यांचा सिहांचा वाटा होता, असा गौप्यस्फोट इम्तियाज यांनी केला.

अर्थात अब्दुल सत्तार यांनी असा दावा यापुर्वी अनेक भाषणांमधून केला होता. पण इम्तियाज यांनी त्याची जाहीर कबुली पहिल्यांदाच दिली. त्यामुळे सहाजिकच राजकीय वर्तुळात याची चर्चा नव्याने सुरू झाली. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता.

सध्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीत सत्तार आणि खैरे यांचे सुर जुळलेले आहेत. अशात इम्तियाज यांनी हे विधान करत या दोघांच्या मधुर संबंधात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. तर आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी माझे इम्तियाज जलील यांच्यांशी चांगले जमते, असे म्हणत सत्तार यांनी देखील इम्तियाज यांच्या विधानाला पाठबळ दिले.

Mp Imtiaz Jalil-Abdul Sattar
महागाईचा भडका, गॅस सिलेंडर खांद्यावर घेऊन शिवसैनिकांचा मोदी सरकार विरोधात आक्रोश...

एवढ्यावरच है कौतुक थांबले नाही. सत्तार हे जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर आहेत, ते जे ठरवतात ते तडीसच नेतात, अशी स्तुतीसुमने उधळत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे राजकारण भविष्यात त्यांच्याच भोवती फिरणार, याकडे लक्ष वेधले. सत्तार-इम्तियाज यांच्या या एकमेकांच्या कौतुकाने शिवसेनेत मात्र याचे पडसाद नजीकच्या काळात उमटल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com