तेव्हा आम्ही नुसतं गोल गोल फिरायचो; संजय शिरसाटांनी सांगितला किस्सा...

Sanjay Shirsath : आज आमची बिल्ली आम्हालाच म्याऊ करते...
 Sanjay Sirsath Latest News
Sanjay Sirsath Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यावर त्यांनी भाजप आणि सोबत आलेल्या आमदारांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

शिवसेना कुणाची अणि पक्षचिन्ह कुणाचं? यावरूनही दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेचा परंपरागत असलेल्या दसरा मेळाव्यावरून देखील या दोन्ही गटात चुरस निर्माण झाली आहे. मुंबईत होत असलेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यास गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून या तयारीच्या औरंगाबात येथील सभेत शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्व आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदात टीका केली. तसेच शिवसेनेत असतांना आपली कशी कोंडी होत होती याबाबत आपलं मत मांडलं आहे. (Sanjay Sirsath Latest News)

 Sanjay Sirsath Latest News
अनिल परब, सुभाष देसाई हे 'मातोश्री'चे गोचीड, रक्त पिऊन कसे टम्म झाले...

शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असतांना मतदारसंघातील कार्यकर्ते मला म्हणायचे की, तुम्ही सारखं मुंबईत असता. आमचे प्रश्न मुख्यमंत्र्याला का सांगत नाहीत आणि आमचे प्रश्न का सोडवत नाहीत. पण त्यावेळी भेटायचं कुणाला? ते (उद्धव ठाकरे) भेटतच नव्हते. आम्ही नुसतं गोल गोल फिरत राहायचो, असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, पूर्वी आमच्याकडे वाकड पाहायची कुणाची हिंमत नव्हती, पण आज आमची बिल्ली आम्हालाच म्याऊ करते. शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळाल्यावर ते खैरे घोषणा देतंय काय, त्यात ते घोडले पेढे घालताय काय अन् त्याचे फोटोग्राफर फोटो काढतय, अशा शब्दात त्यांनी खैरेंची खिल्ली उडवली. दरम्यान, खैरेंनी सांगावं की गेल्या निवडणुकीत आपला कोणामुळे पराभव झाला. कोणी नरडी दाबली, कळतच नाही साले यांना, अशा शब्दात त्यांनी खैरेंवर टीका केली.

 Sanjay Sirsath Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

एक चांगलं झालं की आम्ही उठाव केला, त्यात एक जण शिवसैनिक म्हणाला की बरं झालं यामुळे आम्हाला मातोश्री तरी पाहायला मिळाली. मी जास्त बोलतो म्हणून माझा प्रॉब्लेम होतो. काँग्रेसचे लोक म्हणजे अजगर आहेत.आणि हे खैरे सांगतात माझ्याबद्दल तेव्हाच गेलो असतो तर बरं झालं असतं, असे सांगत आहेत. जरा तारतम्य ठेवा, असा सल्लाही यावेळी शिरसाटांनी खैरेंना दिला. तसेच, उद्याच्या निवडणुकीत काय होईल हे माहीत नाही. पण सर्वस्व पणाला आम्ही लावलं आहे, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com