जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बागडे पुन्हा मैदानात ; महाविकास आघाडीचेही प्रयत्न

आज शेवटच्या दिवशी १४ संचालकांच्या जागेसाठी एकूण १०० अर्ज दाखल झाले आहेत. उद्या या अर्जांची पडताळणी होणार आहे. (Aurangabad District)
Mla Haribhau Bagde, Aurangabad

Mla Haribhau Bagde, Aurangabad

Sarkarnama

Published on
Updated on

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांना घालवल्यानंतर आता जिल्हा दूध संघात देखील त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी पॅनल उतरवण्याच्या तयारीत आहे.(Bjp) शिवसेनेकडून (Shivsena) आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघात हरिभाऊ बागडे हे गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांनी खर्चात केलेली काटकसर आणि नियोजनबद्ध कारभारामुळे दुध संघाला सध्या अच्छे दिन आहेत. जिल्हा बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता दुध संघात आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी बागडे यांनी पुन्हा कंबर कसली आहे. पण इथेही त्यांना शिवसेनेचा कडवा विरोध असणार आहे.

जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. उमेदवारी अर्ज प्रक्रियेवर बारकाईन लक्ष ठेवून असलेल्या आमदार हरिभाऊ बागडे यांना शेवटच्या दिवशी आपला व १२ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा सहकारी दूध संघाच्या १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

गुरुवारपर्यंत (ता.२३) ६२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले, यात जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद तालुक्यातून दोन अर्ज बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी दाखल केले. यासह माजी १२ संचालकांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तुळशीराम भोजने यांनी दिली. आज शेवटच्या दिवशी १४ संचालकांच्या जागेसाठी एकूण १०० अर्ज दाखल झाले आहेत. उद्या या अर्जांची पडताळणी होणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा दूध संघ सर्वपक्षीय संचालकांच्या ताब्यात होता. गेल्या वेळची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. यंदाही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न झाले. यासंदर्भात दोन ते तीन बैठकाही झाल्या, मात्र त्यात यश आले नाही. यामुळे आता दूध संघ ताब्यात घेण्यासाठी सर्व दिग्गजांनी जोर लावला आहे. गुरुवारी २९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

<div class="paragraphs"><p>Mla Haribhau Bagde, Aurangabad</p></div>
तेरणा कारखाना सावंतांनी घेतला, पण देशमुखांच्या आक्षेपाने बाॅयलर थंडच

३४६ मतदार १४ उमेदवारांची निवड करणार आहेत. आमदार हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संस्था टिकावी, त्यात नानांचे नेतृत्व असावे, यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बागडे यांनी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जाते. त्यांच्यामुळेच जिल्हा बँक आणि दूध संघ आज चांगल्या स्थितीत आहे. त्यांचे नेतृत्व दुध संघात असावे, असे आम्हा कार्यकर्त्यांना वाटते, म्हणून त्यांनी अर्ज भरण्यास तयार केल्याचे राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com