Bajrang soawane : बीड जेल प्रशासनाकडून 'ऑल इज वेल'चा दावा, तर बजरंग बाप्पा म्हणतात, सगळाच घोळ; अधीक्षकांचे निलंबन करा!

Bajrang Sonawane demands suspension of Beed Jail: खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड कारागृहातून कथित गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत अधीक्षक राजाराम चांदणे व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी अपर पोलीस महासंचालकांकडे केली.
Walmik Karad, Bajrang Sonwane
Walmik Karad, Bajrang SonwaneSarkarnama
Published on: 
Updated on: 

नितीन चव्हाण

Beed news : बीड जिल्हा कारागृहातून चालू असलेला राजकीय आणि गुन्हेगारी कट-कारस्थानांचा खेळ आता थेट मुंबई-पुण्याच्या वरिष्ठ पोलीस वर्तुळात पोहोचला आहे. विलास घुले संशयास्पद मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला, सौरव सोनवणेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने कारागृहातूनच फिल्डिंग लावल्याचा प्रकार समोर आला.

बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड याने तुरुंगातून बाहेर केलेल्या कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करत कारागृह आणि अधीक्षक यांना धारेवर धरले. यानंतर बीड कारागृह प्रशासनाने आपला बचाव करत सर्व आरोप फेटाळले. बीड कारागृहात सर्वकाही सुरळीत म्हणजेच ऑल इज वेल असल्याचा दावा कारागृह अधीक्षक राजाराम चांदणे यांनी केला आहे.

मात्र खासदार बजरंग सोनवणे हे आपल्या दाव्यावर ठाम असून त्यांनी आता थेट अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक (पुणे) यांच्याकडे बीड कारागृह अधीक्षक राजाराम चांदणे यांच्यासह दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ निलंबनाची मागणी पत्राद्वारे केली आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी केज येथील पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत मोठा बॉम्ब फोडला होता. या ऑडिओमध्ये कारागृहात असलेला वाल्मीक कराड बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधून विलास घुले यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवणे, आंदोलनात्मक परिस्थिती निर्माण करून जिल्हा व पोलीस प्रशासनाला धारेवर धरणे, सौरव सोनवणे याला खुनाच्या गुन्ह्यात कसं अडकवायचं, हे सांगत होता.

Walmik Karad, Bajrang Sonwane
Maharashtra ACB : लाचखोरांविरोधात 'अँटी करप्शन'चा धडाका, तब्बल 3 कोटींहून अधिक रकमेच्या प्रकरणांत पर्दाफाश

या प्रकारामुळे बीडच्या सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगत खासदार सोनवणे आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे, बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक राजाराम चांदणे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाल्मीक कराडच्या कोठडीवर १२ हाय-टेक कॅमेऱ्यांची २४ तास नजर आहे. नियमानुसार कैद्याला आठवड्यातून तीन वेळा १० मिनिटांसाठी नोंदणीकृत तीन नातेवाईकांशीच बोलता येते. पूर्वी फोनवर नातेवाईकांनी दुसऱ्या कोणाला कॉन्फरन्सवर घेतले तर तांत्रिक अडचण यायची, पण गेल्या चार महिन्यांपासून ही सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ​त्यामुळे कारागृहातून कोणतीही बेकायदेशीर यंत्रणा चालत नसल्याचा ठाम दावा प्रशासनाने केला.

Walmik Karad, Bajrang Sonwane
PDCC Bank Election : अपात्रतेची टांगती तलवार! पवार, भरणे, वळसे-पाटील, दुर्गांडेंचा ‘बी प्लॅन’ तयार ! तीन वर्षांत पुन्हा...

कारागृह प्रशासनाने दिलेल्या या उत्तरावर समाधान न मानता खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे पत्र पाठवून कठोर पावले उचलण्याची मागणी केली. पत्रातील प्रमुख मागण्यांमध्ये ३ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवर आजपर्यंत कोणती चौकशी झाली आणि काय कारवाई झाली, याचा लेखी अहवाल द्यावा.

कारागृहातून बाहेरील गुन्हेगारी कारवायांचे नियोजन होणे हा सुरक्षेचा आणि कर्तव्यपालनाचा गंभीर भंग आहे, जिल्हा कारागृह अधीक्षक तसेच संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीचा समावेश आहे. बीडमधील राजकीय वातावरण या आरोप-प्रत्यारोपांनी तापले असून, आता राज्याचे कारागृह महानिरीक्षक या पत्रावर बीड कारागृह प्रशासनावर काय कारवाई करतात,? याकडे संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com