Bajrang Sonawane Vs Munde: मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'ची चर्चा अन् खासदार सोनवणेंचं मोठं विधान; म्हणाले,'त्यांना मंत्रिपद अन् कराडला जामीन...'

Bajrang Sonawane On Dhananjay Munde : माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडील सर्व खातीही काढून घेण्यात आली आहेत. अशातच कोकाटेंच्या जागी मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मुंडेंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
Bajarang Sonawane On Walmik Karad  .jpg
Bajarang Sonawane On Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका देत सदनिका घोटाळा प्रकरणातील त्यांची शिक्षा कायम ठेवली. याचदरम्यान, कोकाटेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली आहेत. अशातच कोकाटेंच्या जागी मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मुंडेंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत.

या चर्चांचं कारण म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी(ता.17) अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'च्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता त्यांचे कट्टर विरोधक आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी जोरदार टोला लगावला आहे.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे मंत्री होणारच नाहीत, जर तर वर मी बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगत असून आता ते महाराष्ट्राह दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचं असेल तर अमेरिकेला जावं लागेल, असा चिमटाही खासदार सोनवणे यांनी मुंडेंना काढला.

वाल्मिक कराडला जामीन होणार नाही, आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार नाही. दोन गोष्टी पक्क्या आहेत,असंही बजरंग सोनवणे यांनी ठणकावून सांगितले. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घेतलेल्या भेटीवर सोनवणे यांनी ते त्यांच्या पक्षाला अंधारात ठेऊन, मुंबईला चाललो म्हणून दिल्लीला आले आहेत. ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ते अंधारात ठेवतात, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Bajarang Sonawane On Walmik Karad  .jpg
Manikrao Kokate Resign: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: महायुती सरकारमधील दुसरी विकेट पडली? कोकाटेंकडील सर्व खाती काढली

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे. बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com