Lok Sabha Result Analysis : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा 'स्ट्राइक रेट' दमदार; तर महायुतीचे काय...

Lok Sabha Eletion Result :राज्यात गेल्या दोन वर्षात घडलेल्या घटना घडामोडीमुळे मतदारांनी महायुतीच्या विरोधात कौल दिला. त्यासोबतच शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा मुद्दा, यामुळे महायुतीची निवडणूक काळात चांगलीच अडचण झाली.
Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar
Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar Sarkarnama

MVA Political News : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीची मतमोजणी पार पडली त्यानंतर निकाल आले आहेत. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. या थेट लढतीत आश्चर्यकारकरित्या महाविकास आघाडीने मैदान मारले. दुसरीकडे स्ट्राइक रेट चांगला ठेवत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली आहे.

या निवडणुकीनंतर एक्झिट पोलने अंदाज वर्तवला होता. हा वर्तविण्यात आलेला अंदाज खोटा ठरवत महाविकास आघाडीने (MVA) मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात घडलेल्या घटना घडामोडीमुळे मतदारांनी महायुतीच्या विरोधात कौल दिला. त्यासोबतच शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा मुद्दा, यामुळे महायुतीची निवडणूक काळात चांगलीच अडचण झाली. ( Lok Sabha Election Result News )

या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी महविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ तर अपक्षाला एक जागा मिळाली. या निवडणुकीत तब्बल 28 जागा भाजपने लढल्या होत्या, त्यापैकी केवळ 9 जागी विजय मिळवता आला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षामधील राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षाने सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 8 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट जवळपास 80 टक्के इतका राहिला.

दुसरीकडे त्या खालोखाल काँग्रेसने जवळपास 17 जागा लढल्या होत्या तर 13 जागी विजय मिळवला त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट जवळपास 76 टक्केच्या आसपास राहिला. शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढल्या त्यापैकी 7 जागा जिंकल्या त्यांचा स्ट्राइक रेट 47% इतका आहे तर शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढल्या तर त्यापैकी 9 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट 43% च्या आसपास राहिला.

Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar
Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातून 26 मराठा खासदार लोकसभेत, ओबीसी किती?

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने 28 जागा लढल्या होत्या, त्यापैकी केवळ 9 जागी विजय मिळवला त्यांचा स्ट्राइक रेट 31.33% इतका आहे. सर्वात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 जागा लढल्या होत्या. त्यामधील एक जागा जिंकल्याने स्ट्राइक रेट 25 टक्के इतका होता.

त्यामुळे या निवडणुकीत मूळ पक्षांच्या पाठीशी मतदार असल्याचे चित्र निकालानंतर दिसत आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) पडलेल्या फुटीनंतर आम्ही असली तुम्ही नकली असा दावा दोन्ही गटाकडून केला जात होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर फुटून बाहेर पडलेल्या पक्षाच्या पाठीशी जनता नसल्याचे दिसत आहे.

Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar
Jalna Lok Sabha 2024 Analysis: सत्तार-भुमरे यांच्याकडूनही रावसाहेब दानवेंचा 'करेक्ट' कार्यक्रम..

या तीन मंत्र्यांना बसला पराभवाचा धक्का

या निवडणुकीत सर्वाधिक फटका हा भाजपला (Bjp) बसला असून अनेक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का सहन कारवा लागला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नवनीत राणा, उज्वल निकम या मंडळींना पराभव सहन करावा लागला आहे.

Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar
Pune Bjp : धंगेकर पडले, धीरज घाटे, हेमंत रासने आमदारकीच्या उमेदवारीसाठी लढले !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com