Political News : अहो नाही हो, त्याचा विपर्यास केला! 'त्या' विधानावरून बावनकुळेंनी घेतला 'यू टर्न'

Bjp Political News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असतात.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या विधानामुळे देखील त्यांची नेहमीच चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पत्रकारांना धाब्यावर घेऊ न जावा, अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. 'त्या' विधानावरून आता बावनकुळेंनी 'यू टर्न' घेतला आहे.

Chandrashekhar Bawankule
Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून अन् केजरीवालांनी काँग्रेस सरकारचीही लावली चौकशी

तुळजापूर दौऱ्यावर आल्यानंतर याच त्यांच्या विधानावरून बावनकुळे यांना माध्यमांनी पुन्हा एकदा चांगलेच धारेवर धरले. आतापर्यंत किती पत्रकारांनी धाब्यावरच्या त्या ऑफरचा लाभ घेतल्याचा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या विधानावरून खुलासा करत त्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

आम्ही कितीही चांगली कामे केली आणि त्याची महिती माध्यम प्रतिनिधिंना योग्य प्रकारे दिली नाही तर ते कधीही योग्य प्रकारे त्याची मांडणी करु शकणार नाही. त्यामुळे माध्यम प्रतिनिधीशी कसे वागावे, या संदर्भात पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचना केल्या होत्या असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळेंनी शहराध्यक्ष पेंदे यांना दाखवला हात

'राज्यात भाजपची सत्ता येवु दे!' अशी घोषणा भाजपचे (Bjp) तुळजापुर शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी करताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात दाखवत शांत केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule ) यांनी बुधवारी तुळजा भवानी मातेचे दर्शनासाठी घेतले. त्यावेळी भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी 'राज्यात भाजपची सत्ता येवु दे' अशी घोषणा दिली होती.

दोनच दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस हे २०२४ ला वानखेडेच्या मैदानावर शपथ घेतील, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य त्यांच्या काहीसे अंगलट आल्याने त्यांनी शहराध्यक्ष पेंदे यांना हात दाखवत शांत केल्याची चर्चा रंगली होती.

(Edited by Sachin Waghmare)

Chandrashekhar Bawankule
काॅंग्रेसच्या निर्दयी आणि असंवेदनशीलपणाची इतिहासात नोंद होईल ; आक्षेपावर बावनकुळे संतापले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com