Maratha Reservation : एकीकडे मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत असून, एसटी बस, खासगी बस पेटविण्याचे प्रकार होत असताना आता दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्याची गाडी पेटविण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. आष्टी शहरात तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची सरकारी गाडी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. आष्टी शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, सरकारी क्वाॅर्टरमध्ये राहत असणाऱ्या त्यांच्या चालकाच्या घरासमोर त्यांनी गाडी लावली होती. रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रमोद गायकवाड, पोलिस निरीक्षक खेतमाळस, नगराध्यक्ष जिया बेग यांनी तातडीने धाव घेत अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत पूर्ण गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान, ही गाडी कोणी पेटवली ? कशामुळे पेटवली ? हे अध्याप स्पष्ट झालेलं नाही. बीडच्या आष्टी पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक खेतमाळस यांनी फोनवरून दिली आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलनाची धग वाढल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून बीड शहराच्या बाहेर होणारे उग्र आंदोलन आता बीड शहरातदेखील होऊ लागले आहेत. रात्री अकराच्या दरम्यान बीड शहरातील मुख्य चौक असणाऱ्या बार्शी नाका चौकामध्ये, मराठा आंदोलकांनी टायर जाळून मुख्य महामार्ग अडवला होता. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करत सरकार विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने मराठा आरक्षणाचा विषय तत्काळ सोडवावा, अन्यथा याचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशारा या वेळी मराठा आंदोलकांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.