
Beed Political News : बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याला शिरूर कासार न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश भोसलेविरुद्ध वन्य प्राण्यांच्या शिकार, त्यांच्या मांसाची तस्करी यासह अन्य 20 गुन्हे दाखल आहे.
अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना, सतीश भोसलेचा वकिलांनी न्यायालयात तो सामाजिक कार्यकर्ता असून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरील राग त्याच्यावर काढण्यात आला, असा दावा केला. सतीश भोसलेच्या याच्या वकिलांच्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
सतीश भोसले हा बीडमधील (BEED) जातीय राजकारणाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया देताना, त्याचे वकील अंकुश कांबळे यांनी तो एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली, असा दावा केला. एखाद्या मागासवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या सुरू असलेल्या जातीय राजकारणाचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे, असा दावा केला.
सतीश भोसले याच्या सामाजिक कार्याचे गुणगान करताना, वकिलांनी तो सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा केला. अनेकांना मदत केली आहे. गरीबांच्या मुलांना वह्या-पुस्तके, ऊसतोड कामगारांना रेशन धान्य पुरवले असून, ते त्याचा चांगले काम पुढं आणले गेले नाही, असा दावा देखील केला.
भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बीडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याने धस यांच्यावरील राग त्याच्यावर काढला जात हे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार आहे. सतीश भोसले याचे घर पाडले गेले, त्याच्या घरच्यांनी देखील मारहाण केले गेली. हे कोणत्या कायद्यात बसते, याकडे सतीश भोसलेच्या वकिलांनी लक्ष वेधले.
सतीश भोसले याने वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधले होते. त्यावर वनविभागाने कायदेशीर कारवाई करत बुलडोझर फिरवला. ते पाडलेले घर काही जणांनी मध्यरात्री पेटवून दिले. याशिवाय महिलांना देखील मारहाण झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.