Beed Crime News : हवेत गोळीबार करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं तिघांच्या अंगलट, परळी पोलिसांची मोठी कारवाई

Beed Crime News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अंजली दमानिया यांच्याकडून बीडमधील काही लोकांची हातात बंदूक घेतल्याचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 29 Dec : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडमधील काही लोकांची हातात बंदूक घेतल्याचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

त्यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी फोटोतील व्यक्तींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता परळी (Parli) तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार केल्याचा फोटो व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आता पुन्हा एकदा परळी ग्रामीण पोलिसांत आणखी 3 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हवेत गोळीबार करतानाचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये परवानाधारक तर एक अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांचा समावेश आहे.

Beed Crime News
Chandrant Patil : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादात चंद्रकांत पाटलांची मध्यस्ती, म्हणाले, "दोनवेळा फोन केला..."

या प्रकरणी माणिक हरिश्चंद्र फड रा. कन्हेरवाडी याच्याकडे परवानाधारक पिस्टल आहे. त्याने पिस्टलसह फोटो काढून तो सोशल मिडीयावर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसंच परवान्यातील नियमांचे उल्लंघन केला, अशी पोलिस (Police) कर्मचारी विष्णू घुगे यांनी तक्रार दिली होती त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Beed Crime News
Anjali Damania : संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेलं 'ते' वक्तव्य अंजली दमानियांना भोवणार? बीड पोलिसांनी धाडली नोटीस

तर जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे रा. अंबाजोगाई याने पोळ्याच्या दिवशी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक बारा बोअर बंदूकीतून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला. तर कुणाल श्रीकांत फड रा. दाऊदपूर याने त्याच्याकडे पिस्टल परवाना नसतानाही त्याने पिस्टलसोबत फोटो काढून ते सोशल मिडीयावर अपलोड केले. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com