Sambhaji Nagar News: महायुतीचा 'रात्रीस खेळ चाले'! भाजप अध्यक्षांच्या घरी रात्री उशीरापर्यंत बैठक, पण...

Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा करत भाजपने शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरू केली आहे.
Sambhaji Nagar Mahapalika News
Sambhaji Nagar Mahapalika News
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा करत भाजपने शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरू केली आहे. मंत्री अतुल सावे यांनी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला असेल तरच चर्चा होईल, असे सांगत टोकाची भूमिका घेतली होती. तर शिवसेनेने नमते घेत आम्ही छोट्या भावाच्या भूमिकेत जाऊ, पण सन्मानजनक आणि लवकर निर्णय घ्या. कोणीही मोठा-छोटा नाही तर आपण जुळे भाऊ आहोत, अशी व्यापक व्याख्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मांडली.

Sambhaji Nagar Mahapalika News
Nashik Politics : भाजपच्या दणक्यानंतर 'मविआ' जमिनीवर, जागावाटपासाठी शिवसेना कार्यालयात तातडीची बैठक

यावरही युतीचे घोडे काही पुढे सरकताना दिसत नाही. अगदी काल रात्री दीड वाजेपर्यंत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी शिवसेना-भाजप नेत्यांची बैठक सुरू होती. तोडगा निघत नसल्याने संजय शिरसाट या बैठकीतून निघून गेले. त्यानंतरही भाजपचे नेते उशीरापर्यंत आकडेमोड करत बसले होते. युतीच्या या 'रात्रीस खेळ चाले'ला आत दोन्ही बाजूंचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वैतागले आहेत. एक घाव दोन तुकडे एकदाचे करून टाका, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Sambhaji Nagar Mahapalika News
Ichalkaranji election : महायुतीत भाजप-शिवसेनेचं ठरलं, राष्ट्रवादीची स्वतंत्र वाटचाल? इचलकरंजीच राजकारण नव्या वळणावर

भाजपकडून राज्यातील सत्ता, नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतील यशाचा दाखला देत जास्त जागांची मागणी केली जात आहे. तर शिवसेनेने समसमान जागा वाटपाचा आग्रह धरला आहे. त्यात दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी असल्याने कोणत्या प्रभागात कोणी कुर्बानी द्यायची, यावरही एकमत होतांना दिसत नाही. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत बैठका घेऊनही युतीवर तोडगा निघताना दिसत नाही. संभाजीनगरसह मराठवाड्यातील पाचही महानगरपालिका संदर्भात दोन्ही पक्षांकडून ताठर भूमिका पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.

Sambhaji Nagar Mahapalika News
Navi Mumbai Municipal Corporation : माजी नगरसेवकांचा कहर, स्वतःसह पत्नी, मुलगा, सून, छोट्या मुलासाठी तिकिटांची मागणी! एकनाथ शिंदेंना होतय ब्लॅकमेलिंग?

भाजप- सेना युती ही अंतिम टप्प्यात आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील. आज आम्ही बसणार आहोत, मराठवाड्यातील सर्वच महानगरपालिकाबद्दल अतुल सावे आणि आम्ही चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं खूप काही अडचणी नाही निर्णय होऊन जाईल. ज्या ज्या जागेवर आमची ताकद किती आहे ते बघून चार-पाच पॅरामीटरवर आम्ही चर्चा करत आहोत. आज रात्रीपर्यंत मी अतुल सावे यांच्याबरोबर चर्चा करणार आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करू आणि निर्णय अंतिम करू, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com