Beed News: वाळूमाफियांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीलाच ओव्हरटेक; रात्रीच्या अंधारात जीवघेणा थरार, नेमकं काय घडलं?

Beed News : बीड'च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ छत्रपती संभाजीनगरहून बीड निघाल्या होत्या.
Deea Mudhol
Deea Mudhol Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीड जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दिपा मुधोळ (Deepa Mudhol) यांच्या गाडीवरच वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. (Beed District Collector Deepa Mudhol's car overtaken by tipper, bodyguard injured)

Deea Mudhol
Baramati Dudh Sangh Eelection : अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर; बिनविरोधची परंपरा कायम राहणार?

मिळालेल्या माहिती नुसार, बीड'च्या (Beed News) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ छत्रपती संभाजी नगरला गेल्या होत्या. काम आटोपून रात्री उशिरा त्या बीडकडे निघाल्या होत्या. पण गेवराईजवळ वाळू वाहतूकीचा एक टिप्पर त्यांच्या निदर्शनास आला. टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांनी टिप्परला ओव्हरटेक केला. पण टिप्पर चालकाने थेट मुधोळ यांच्या गाडीवरच टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान, मुधोळ यांच्या सुरक्षा रक्षकाने जीव धोक्यात घालून टिप्पर चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला.यात त्यांला गंभीर दुखापतही झाली. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तीन किलोमीटर पेक्षा हा सिनेस्टाईल थरार सुरु होता.मुधोळ यांनी हा प्रकार सुरु असतानाच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना फोन करून या टिप्परचालकाला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

Deea Mudhol
Maharashtra Congress News : काँग्रेसही भाकरी फिरवणार? अनेक निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरलेले 'हे' दोन नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

पण यात सुरक्षारक्षक अंबादास तावणे गंभीर जखमी झाले.तर मुधोळ याही थोडक्यात बचावल्या.या प्रकरणी एलसीबीने टिप्पर चालकाला अटक केली असून मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. बीडमध्ये (Beed Politics) दिवसेंदिवस वाळूमाफियांची दादगिरी वाढत चालली आहे. पण हे वाळू माफिया जर जिल्हाधिकाऱ्यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांना घाबरत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा प्रश् स्थानिक नागरीक उपस्थित करत आहेत. तसेच महसूल प्रशासनाने या माफियांवर वेळीच कारवाई केली असती, तर अशा घटनाच झाल्या नसत्या, असही नागरिक म्हणत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com