Beed Accident : बीड हादरलं! मध्यरात्री सहा जणांवर काळाचा घाला, अपघातातून बचावले पण कंटेनरने चिरडलं

Bheed District Accident : बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यू झालेले सहा जण अपघातातून बचावले होते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
Beed Accident
Beed AccidentSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 27 May : बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यू झालेले सहा जण अपघातातून बचावले होते.

मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गढी पुलावर हा अपघात झाला. या पुलावर एक एसयूव्ही कार डिव्हायडरला धडकली.

या अपघातात कारमधील प्रवाशांना कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण प्रयत्न करत असतानाच महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सर्वांना धडक दिली.

Beed Accident
Amit Shah Speech In Nanded : बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ऑपरेशन 'सिंदूर'साठी मोदींना मिठी मारली असती!

ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक सरोया, भागवत परळकर, बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि सचिन ननवरे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Beed Accident
Top Ten News : जरांगेंची महिला आयोगावर नाराजी; लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; पहिल्याच पावसानं मुंबईची दाणादाण! - वाचा महत्वाच्या घडामोडी...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com