Beed ZP News : बीड जिल्हा परिषदेची प्रभाग रचना जाहीर, केजमध्ये एक गट दोन गण वाढले!

Beed Zilla Parishad sees the addition of one group and two new wards : येणाऱ्या निवडणुकीत एक गट वाढून ही संख्या आठ तर पंचायत समिती गणांची संख्या 16 असेल.
Beed ZP Election News
Beed ZP Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Local Body Election : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. जिल्ह्यात होणारी निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 122 पंचायत समिती गणात होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जॉन्सन यांनी अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर केली.

दरम्यान, 14 जुलै रोजी प्रारूप रचना यादी प्रसिद्ध झाली होती. त्यावर 66 आक्षेप आले होते. (Zilla Parishad) यात सर्वाधिक 32 हे केज तालुक्यातील होते. या आक्षेपांवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर या अंतिम प्रभाग रचनेत केज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. 2017 च्या निवडणुकीत केज तालुक्यात जिल्हापरिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे 14 गण होते.

येणाऱ्या निवडणुकीत एक गट वाढून ही संख्या आठ तर पंचायत समिती गणांची संख्या 16 असेल. (Beed News) प्रारूप प्रभाग रचनेवरील आक्षेपानंतर आता आडस गटातील तांबवा गणात पूर्वी युसूफवडगाव गटात प्रस्तावित असलेल्या भाटुंबा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गणातील प्रस्तावित ढाकेफळ गाव अंतिम प्रभाग रचनेत आडस गटातून वगळण्यात आले आहे.

Beed ZP Election News
Beed Collector News : खबरदार नेत्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचे फोटा लावाल तर! बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश..

तर होळ जिल्हा परिषद गटातील होळ गणामध्ये पूर्वी युसूफवडगाव गटात प्रस्तावित असलेले सावळेश्वर हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. तर युसूफवडगाव या गटामधून भाटुंबा आणि सावळेश्वर ही गावे वगळून त्या गटात ढाकेफळ हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. अंतिम प्रभाग रचना घोषित झाल्यामुळे इच्छुक आणि राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Beed ZP Election News
Manoj Jarange : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, आक्रस्ताळेपणा नाही...

2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पहिली अडीच वर्ष अध्यक्ष पद भाजपाकडे होते. त्यावेळी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी सत्ताचक्र फिरवत सत्ता स्थापन केली. सुरेश धस गटाचे राष्ट्रवादीचे 7 सदस्य भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं.

Beed ZP Election News
Beed Politics: बीडमध्ये अजितदादा लवकरच दुसरा मोठा डाव टाकणार; पंकजा मुंडेंनंतर आता शरद पवारांना धक्का? आमदाराशी जवळीक वाढली

यानतंर सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पहिल्या अडीच वर्षात भाजप, शिवसेना, शिवसंग्राम यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता मिळवली होती. गेल्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस-19, काँग्रेस-3, भाजपा 19, शिवसेना-४,काकू-नाना आघाडी-2, अपक्ष- 2 तर शिवसंग्राम पक्षाचे चार सदस्य होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com