Beed Election News: बीडमध्ये गुलाल कोण उधळणार ? 19 दिवस वाट बघावी लागणार

Political News: गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. जसाजस मतदानाचा दिवस पुढे येत होता. त्याप्रमाणात धुराळा उडत गेला.
Pankja munde, bajrang sonavane
Pankja munde, bajrang sonavane Sarkarnama
Published on
Updated on

Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघात बैठका, मेळावे, पदयात्रा, रॅलीने सर्व कार्यकर्त्यानी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. जसाजस मतदानाचा दिवस पुढे येत होता. त्याप्रमाणात धुराळा उडत गेला.

सोमवारी बीड जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान पार पडले. त्यासाठी दिसवसभर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राबत होते. त्यादिवशी मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील कार्यकर्त्यात मोठा उत्साह जाणवत होता. आता मतदानाच्या आकडेवारीवरून विविध अंदाज बांधले जात आहेत.

बीड मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या ठिकाणी महायुतीकडून माजी मंत्री पंकज मुंडे (Pankja Munde) या रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनावणे (Bajarang Sonavane) यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.

Pankja munde, bajrang sonavane
Nitin Gadkari News : डॉ. भारती पवारांसाठी नितीन गडकरींची चांदवडला जोरदार बॅटिंग..

बीड लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी झालेल्या निवडणुकीत सोमवारी चुरशीने मतदान झाले. याठिकाणी जवळपास ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच निकालाची आतुरता लागली आहे.

बीडमध्ये गुलाल कोण उधळणार हे समजण्यासाठी १९ दिवसांची अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात चर्चेला ऊत आले आहे. निकाल काय असणार याबाबत चौकाचौकात चर्चा सुरु आहेत. त्यासोबतच अनेकांच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. जवळपास ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसले. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरात चर्चा सुरु आहे. दुसरी गोष्ट भाजपची यंत्रणा निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसली. त्यामुळे या निवडणुकीत कमळ की तुतारी बाजी मारणार यावर अनेक पैजा लागल्या आहेत.

जिल्ह्यातील मुंडे बंधू-भगिनींचे होम पीच असलेल्या परळी मतदारसंघात जवळपास 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. या ठिकाणी भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत होती. याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कमळ की तुतारी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pankja munde, bajrang sonavane
Beed Lok Sabha News : बीडमध्ये तुतारी की कमळ ? राजकीय विश्लेषकांचे म्हणणे काय...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com