Dindori constituency News : दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारासाठी मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. या सभेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटच्या टप्प्यातील ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून होणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांचे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कधीही अडचण होऊ देणार नाही. यासंदर्भात कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक योजना त्यांनी मांडल्या. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कृषी क्षेत्राचा विकासदर निगेटिव्ह होता.
शेती क्षेत्राची प्रगती मर्यादित होती. मात्र गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे शेती क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या आहेत. सध्या शेती क्षेत्राचा विकास दर तीन टक्के झाला आहे. अनेक कायमस्वरूपी योजना राबविल्या जात आहे. कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी साठवणुकीची योग्य व्यवस्था करण्याचे धोरण आहे. कांदा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करण्याची गरज आहे. तशी व्यवस्था सरकारने करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रस्ते आणि महामार्गांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात दिंडोरी सह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे या क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. भारती पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले त्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवार आहेत. त्यामुळे इथली जनता भारती पवार यांना पुन्हा एकदा विजयी करेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
चांदवड येथे झालेल्या सभेला विशेष महत्त्व आहे. मतदारसंघातील हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे या सभेला शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. उमेदवार डॉ. भारती पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे आमदार राहुल आहेर केला आहे. शंकरराव वाघ, भूषण कासलीवाल यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.