Sarpanch Election Result : दिवंगत बापू आंधळेंच्या पत्नीचा सरपंच पदाच्या निवडणुकीत एकतर्फी विजय!

Beed Late Bapu Andhale Wife Dipali Andhale Victory Politics News : बीड जिल्ह्यात झालेल्या काही ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. ज्यात मस्साजोगचा समावेश आहे.
Beed Late Bapu Andhale
Beed Late Bapu Andhalesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागले

  2. मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव झाला

  3. मरळवाडीत दिपाली आंधळे यांनी 435 मतांनी मोठा विजय मिळवला

Beed Politics News : बीड जिल्ह्यात काल जाहीर झालेल्या काही ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. स्वरुपानंद देशमुख यांनी त्यांचा 92 मतांनी पराभव केला. तर तिकडे मरळवाडीत मात्र दिवंगत बापू आंधळे यांच्या पत्नी दिपाली आंधळे यांनी मात्र 435 मतांनी विजय मिळवला.

मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीचा लाभ होईल, असे वाटत होते. परंतु निवडणूक प्रचार काळात स्वरुपानंद देशमुख यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. परिणामी सहानुभूतीच्या लाटेवर गावातील स्थानिक राजकारण प्रभावी ठरले, अशी चर्चा या निकालानंतर होऊ लागली. संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली होती.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मरळवाडीचे सरपंच राहिलेल्या बापू आंधळे यांची 29 जून 2024 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गीते यांच्यावर या हत्येचा आरोप होता. हे प्रकरणही बीड जिल्ह्यासह राज्यात गाजले होते. त्यामुळे मस्साजोग आणि मरळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.

Beed Late Bapu Andhale
Massajog Sarpanch Election Result News : मस्साजोगमध्ये बाहेरचा राजकीय हस्तक्षेप वाढला, अन् मतदारांनी भाकरी फिरवली!

काल निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा मरळवाडीत दिवंगत सरपंच बापू आंधळेंच्या पत्नी दिपाली आंधळे 435 मतांनी विजयी विजयी झाल्या. दिपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा पराभव केला. परळीच्या मरळवाडीच्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीकडे जिल्ह्याच्या नजरा होत्या. सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण होते. ते मतदानाच्या रुपाने बाहेर पडले.

सुरवातीला ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज होता. मात्र मतदानानंतर ती फिरली आणि दिपाली आंधळे यांनी पद्ममीनीबाई आंधळे यांचा पराभव केला. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच असताना जून 2024 मध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

बापू आंधळेंची हत्या का झाली?

29 जून 2024 रोजी रात्री परळीतील बँक कॉलनीत गोळीबार करून सरपंच बापू आंधळे यांचा जुन्या वादातून खून करण्यात आला होता. या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबन गित्ते, महादेव गित्ते आणि इतर पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी बबन गित्ते बऱ्याच काळापासून फरार होता. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलीसांनी कोर्टाची परवानगी मागीतली होती. या प्रकरणात पोलिसांनी पिस्तूल आणि कोयते जप्त केले होते.

Beed Late Bapu Andhale
Massajog Sarpanch Election: मस्साजोगच्या सरपंचपदाचा गुलाल उधळणारे स्वरुपानंद देशमुख नेमके कोण आहेत..?

FAQs :

1. मस्साजोगमध्ये कोणाचा पराभव झाला
अश्विनी देशमुख यांचा स्वरुपानंद देशमुख यांनी 92 मतांनी पराभव केला

2. मरळवाडीत कोण विजयी झाले
दिपाली आंधळे यांनी 435 मतांनी मोठा विजय मिळवला

3. या निकालाला धक्कादायक का म्हटले जाते
सहानुभूती लाट असूनही अपेक्षित निकाल न लागल्यामुळे हा निकाल धक्कादायक मानला जात आहे

4. बीड जिल्ह्यातील राजकारणावर याचा काय परिणाम होईल
या निकालामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे

5. पोटनिवडणुकीत मतदारांनी काय संदेश दिला
मतदारांनी व्यक्तीपेक्षा कामगिरी आणि स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचा संकेत दिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com