बीडमध्ये नियमबाह्य पद्धतीने शिक्षक भरती झाल्याचे उघड झाल्यानंतर विद्यमान आणि तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
भरती प्रक्रियेत पात्रता, नियम व शैक्षणिक निकषांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईमुळे शिक्षण विभागातील भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दत्ता देशमुख
Teacher recruitment Scam News : बीड येथील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी व तत्कालिन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे. या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी (ता. 19) शासनाचे प्रधान सचिव रणजीसिंह देओल यांनी दिले.
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्तच राहीले. मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची लातूरला बदली झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षक भरतीचा शासन आदेश नसताना शिक्षक भरती करून अपहार केल्याची तक्रार सादीक इनामदार यांनी केली होती.
दुसरीकडे नागपूरचा शिक्षक भरती घोटाळा प्रकरणही गाजले होते. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. याच बरोबर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनीही काही शिक्षकांची भरती केली होती. दोघांच्याविरुध्दच्या तक्रारीवरुन विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली.
समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत करुन नेल्या होत्या. प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबर महिन्यात समितीने शिक्षण आयुक्तांना आदेश सादर करुन नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली. या दोघांनाही प्रधान सचिव रनजितसिंह देओल यांनी निलंबीत करण्याचे आदेश काढले.
भरती प्रक्रियेत नियमबाह्य नियुक्त्या, निकषांचे उल्लंघन आणि पात्रतेचे गैरमूल्यांकन झाल्याचे आढळले.
बीड येथील विद्यमान आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी दोघांनाही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
भरतीची प्रक्रिया योग्य न ठेवणे, नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि लाभार्थींना अवैधरीत्या नियुक्त्या देणे.
जिल्हा स्तरावरील तसेच शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत तपास अपेक्षित आहे.
पुढील काळात भरती प्रक्रिया अधिक कडक, पारदर्शक आणि दस्तऐवजीकरणावर आधारित होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.