Walmik Karad News : 'बघून घेतो म्हणून धमकी, जेलरच्या सांगण्यावरून 'त्या' पोलिसाची तक्रार नाही; वाल्मिक,घुलेनं माफी मागितली?

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी हे जेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Beed Jail Walmik Karad .jpg
Beed Jail Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी हे जेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तुरुंगात बाहेर फिरण्याची वेळ झाल्यानंतर आरोपी प्रतीक घुले यांना एक पोलीस कर्मचारी बराकीत जा म्हणत असताना, घुले ने थांब तुला बाहेर गेल्यावर बघतो, अशी धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाची तक्रार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने केली होती. परंतु माझे प्रमोशन थांबेल, लेकरा बाळांचा विचार कर म्हणत तुरूंग अधिकाऱ्याने तक्रार करू दिली नाही.

शिवाय वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि प्रतीक घुले यांनीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची माफी मागितल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलदर यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याचा पश्चातप आरोपींना अजिबात नाही, उलट आपण खूप मोठे शौर्य, पराक्रम केल्याचा माज त्यांच्यात दिसतो आहे. जेलर यांनी हे प्रकार तातडीने रोखावेत अन्यथा, शिवसेना तुम्हाला साडीचोळी भेट दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही स्वप्नील गलधर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयातील सुनावणीत वेळकाढूपणा केला जात आहे. प्रतीक घुले याने आपल्याला चक्कर येत असल्याचे सांगत दवाखान्यात दाखल होण्याचे नाटक केले होते, असा आरोप करतानाच वाल्मिक कराड, प्रतीक घुले व इतर आरोपींना आपण सुटणार असा विश्वास वाटू लागला आहे. त्यांनी न्यायालयं विकत घेतली आहेत का? तुम्ही सुटले तरी बीडची जनता तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही गलधर यांनी देत संताप व्यक्त केला.

जेलमध्ये वाल्मिक कराड हा सर्रास मोबाईल वापरतो, श्वास घ्यायला त्रास होतो असे सांगून जे मशीन तो वापरतो त्यातून मोबाईल चार्ज केला जात असल्याचा दावा स्वप्नील यांनी केला आहे. गलधर यांनी काल आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट केली होती. त्यात मी खूप दिवस शांत होत्तो पण आता राहवत नाही, काल या आठवड्यात एक वर्ष पूर्ण झाले. आदर्श सरपंच संतोष अण्णा यांच्या क्रूर हत्येला.

Beed Jail Walmik Karad .jpg
Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण? शिवसेना-भाजप युतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा?

कालची गोष्ट कोर्टात सुनावणी सुरु असताना, एका आरोपीनी कोर्टाचा वेळ खाण्यासाठी चक्कर येन्याचे नाटक केले. व त्याला जिल्हा रुग्णालयात आणले गेले. नंतर त्याला रुग्णालयातून परत जेल मध्ये पाठवले गेले. जेल मध्ये गेल्यावर त्याचा माज वाढला. हे आरोपी जेलर पिटर गायकवाड यांच्यावर धर्म परिवर्तनाचा व इतर आरोप लावून त्यांची बदली करण्यात यशस्वी झाले. पण संतोष देशमुख यांची हत्या ही एका व्यक्तीची नसून, ती मानव धर्माची हत्या आहे.

जो जो कोणी व्यक्ती आयुष्यात या आरोपीना मदत करेल,त्यांचा भविष्यात इतिहास लिहिला जाईल आणि त्या इतिहासात आरोपी ना मदत करणाऱ्याचे नाव अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिले जाईल, येणाऱ्या सात पिढ्या ते नाव वाचतील, एका न्यायाच्या लढाईत कोणी कोणी काय केले ते.

Beed Jail Walmik Karad .jpg
Ajit Pawar News: पुण्यात यापुढे जर कोयता गँग दिसली, तर...!'; अजितदादांनी पोलीस आयुक्तांना CM फडणवीसांसमोरच ऐकवलं

असो सध्या बीड जेलमध्ये अपहरण पिच्चर मध्ये आरोपींची जशी बडदास्त ठेवली जाते त्या प्रमाणे आरोपीना सुविधा मिळत आहेत. त्यावर पण आम्ही शांत आहोत. पण काल चक्क एका कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. याचा अर्थ असा आहे की आरोपीला आपल्या कृत्याचा कसलाही पस्तावा नाही, शिक्षेचा भय नाही उलट त्यांचा माज वाढला आहे.

तो माज असण्याचे कारण म्हणजे मकोकातील आरोपींना बीड जेलमध्ये ठेवू नका असे सांगितलेले असतांनाही या आरोपींना इथे ठवण्यात आले आहे. सदरील आरोपीचा माज हा फक्त कोणाच्या तरी व कारागृह प्रशासनाच्या अभयामुळे वाढला आहे, लवकरच या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही स्वप्नील गलधर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com