

Pune News : पुण्यातील टोळी युद्ध, गॅंगवॉर आणि कोयता गॅंग यांच्या दहशतीची चर्चा सबंध महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहे. पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच ऐरणी वर राहिला आहे. त्यावरून सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा देखील साधताना पाहायला मिळत आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना चांगलंच ऐकवल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यामध्ये सोमवारी (ता.15 डिसेंबर) 3000 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुण्यातील सात नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 830 पदांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. यासाठी 67 कोटींच्या निधीला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असतो. तसेच गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे कुठलीही मागणी केल्यास ती तातडीने पूर्ण होते. गेल्या वर्षभरामध्ये पाहिलं तर सर्वात जास्त पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या जर मंजूर झाली असेल तर ती पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये झाली आहे.
त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांकडून मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने अपेक्षा करतो की, एवढं सगळं देत आहे. गाड्या देत आहे. घोड्या देत आहे.घोड्या नाही, परंतु गाड्या देत आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मग असं असताना आता ती कोयता गँग दिसायला नको आणि आताच जर कोयता गँग दिसली, तर मग काय खरं नाही, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्र्यांनी देखील शहरांमध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. शहरात पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, त्याशिवाय गुन्हेगारी कमी होणार नाहीत आणि ते लोक शहाणे होणार नाहीत. अजिबात कोणाचा मुलाहिजा करण्याची गरज नाही. कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. मात्र, पुणे शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम असल्याचं अजित पवार म्हणाले.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. ते पुरवण्याचं काम मुख्यमंत्री करतील. तसंच मंत्रिमंडळातील आणि सरकारमधील कुठलाही नेता निधी पुरवताना कमी पडणार नाही. मात्र, कुठेही गुंडांची दहशत निर्माण होता कामा नये, अशा सूचना अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.