

बीड भूसंपादन मावेजा घोटाळ्यात माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत.
तब्बल 250 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप.
SIT तपासादरम्यान पोलिसांची मोठी कारवाई.
Beed Police News : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन व त्यासाठी देण्यात येणाऱ्या मावेजा रक्कमेत तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळ उघडकीस आला होता. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू असतानाच आता पोलीसांनी धडक कारवाई करत तत्कालीन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करत मोठा दणका दिला आहे. या कारवाई बाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी स्वतः माहिती दिली आहे. अविनाश पाठक 2013 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत, सध्या, ते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत.
दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांनाच अटक झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग (सोलापूर-धुळे) भूसंपादन आणि मावेजा वाटपात तब्बल 73 ते 250 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली होती. या प्रकरणात 154 बनावट लवाद आदेश तयार करून, बनावट स्वाक्षरीद्वारे तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव वापरण्यात आले होते.
सुमारे 242 कोटी रुपयांचे बनावट आदेश तयार केले गेले, यापैकी 73 कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्रत्यक्षात वितरित करण्यात आली होती. या प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू आहे. याच प्रकरणात याआधी अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणी अविनाश पाठक यांच्यासह 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग (सोलापूर-धुळे) भूसंपादन आणि मावेजा वाटपात बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून मोठा घोटाळा करण्यात आला. तो करताना तब्बल 154 बनावट लवादा आदेश तयार करून, बनावट स्वाक्षरीद्वारे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नावे सुमारे 241 कोटी रुपयांचे बनावट आदेश तयार केले गेले होते. यापैकी 73 कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्रत्यक्षात वितरित करण्यात आली होती.
हा घोटाळा मार्च ते एप्रिल 2025 मध्ये समोर आला होता. महसूल अधिकारी, कर्मचारी आणि वकिलांच्या संगनमताने हा प्रकार घडला, असे तपासात आढळले होते. याच प्रकरणात आज बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना एसआयटीने (SIT) लातूरमधून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी 10 जणांवर गुन्हे दाखल असून, काही जणांना अटकही झाली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येत असून, तो सध्या पोलीस उपाधीक्षक एम. व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे आहे.
1. अविनाश पाठक कोण आहेत
2013 बॅचचे आयएएस अधिकारी आणि माजी बीड जिल्हाधिकारी
2. त्यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली
भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात अटक झाली
3. घोटाळ्याची रक्कम किती असल्याचा आरोप आहे
सुमारे 250 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप आहे
4. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे
एसआयटीमार्फत तपास सुरू आहे
5. सध्या अविनाश पाठक कोणत्या पदावर होते
महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालक होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.