Beed Lok Sabha Candidate : तुतारी कोणाच्या हाती; बीडमध्ये सोनवणे की मेटे, आज फैसला?

Beed Lok Sabha Election : पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांसह बीड जिल्ह्यातील पक्षाचे नेते तसेच इच्छुकांशी चर्चा केली आहे. आज बुधवारी बीडच्या उमेदवारीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
Jyoti Mete, Sharad Pawar, Bajrang Sonwane
Jyoti Mete, Sharad Pawar, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed Loksabha Constituency : बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी कोणाच्या हाती पडणार याचा फैसला आज होणार असल्याची माहिती आहे. उमेदवारांच्या स्पर्धेत बजरंग सोनवणे व डॉ. ज्योती मेटे यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांशिवाय पक्षातील इतर नेतेही इच्छुक आहेत.

खुद्द शरद पवारांनी बीड सर्वच इच्छुकांसह पक्षातील पहिल्या फळीतील नेते तसेच जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी पक्षाकडून सुरुवातीपासून विविध नावांची चाचपणी केली जात आहे. आचारसंहितेपूर्वी पक्षातील माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. ईश्वर मुंडे आदी नेते उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. या इच्छुकांनी जिल्ह्यात भेटीगाठींचे सत्रही राबविले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. Beed NCP Election Campaign Strategies

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jyoti Mete, Sharad Pawar, Bajrang Sonwane
Shivsena News : संभाजीनगरची जागा आमचीच, पण उमेदवार कोण हे आताच सांगणार नाही...

याच काळात शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी इच्छुकांसह जिल्ह्यातील नेत्यांकडून कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत विचारविनिमय केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्ह्याचे प्रभारी जीवन गोरे आदींसोबतही शरद पवार यांनी बीडच्या उमेदवारीबाबत चर्चा केली आहे. Maharashtra latest News Politics.

बजरंग सोनवणे आणि डॉ. ज्योती मेटे यांचाही पक्षाच्या नेत्यांसोबत भेटी व चर्चांचा सिलसिला सुरूच आहे. बजरंग सोनवणे यांनीही जिल्ह्यात भेटी - गाठी घेतल्या. तसेच, डॉ. ज्योती मेटे यांनीही दौरा करून निवडणूक लढविण्याबाबत संकेत दिले आहेत.

दरम्यान, या चर्चांच्या फेऱ्यानंतर कोण उमेदवार सरस राहील, याच्या मुळापर्यंत पक्ष पोचला आहे. बीडची निवडणूक पुढच्या टप्प्यात असली तरी स्पर्धक भाजपने उमेदवार लवकर जाहीर केल्याने आता राष्ट्रवादी (NCP) शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारी जाहीर करून तुतारी कोणाच्या हाती द्यायची, याचा मुहूर्त काढला आहे. आज बुधवारी खुद्द शरद पवार बीडच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. आता आघाडीवर नावे असलेल्या डॉ. ज्योती मेटे, बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) की अन्य कोणाच्या हाती तुतारी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited BY : Rashmi Mane

R

Jyoti Mete, Sharad Pawar, Bajrang Sonwane
Amarsinh Pandit : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com