Beed Lok Sabha Constituency : उमेदवारी जाहीर होताच सोनवणेंचेही देवदर्शन - भेटीगाठींचे सत्र !

The candidature is announced, Sonwane Start Devdarshan, meeting session : नारायणगडचे घेतले दर्शन, छत्रपती शाहू महाराजांची भेट घेत केली चर्चा
Bajrang Sonwane
Bajrang Sonwane Sarkarnama

Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर गुरुवारी बजरंग सोनवणे यांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणे यांनीही देवदर्शन व भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत आशीर्वाद घेतले, तर छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेऊन संवाददेखील साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पंधरा दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बीड (Beed) लोकसभा मतदारसंघासाठी सोनवणे आणि डॉ. ज्योती मेटे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरु होती. गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी जाहीर होताच सोनावणे यांनी लागलीच देवदर्शन व भेटीगाठींचे सत्र सुरु केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajrang Sonwane
Vanchit News : पंकजा मुंडे अन् बजरंग सोनवणेंचा वंचित लावणार 'निकाल'? बीडमध्ये टाकणार मोठा डाव

जिल्ह्यात एन्ट्री करत त्यांनी आष्टी तालुक्यातून आपल्या भेटीगाठीचे सत्र सुरू केले.अनेक वर्षे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारण व राजकारणात काम करतोय. येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करतोय. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) माझ्यावर विश्वास टाकत सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. मागच्या वेळी दुर्दैवाने अपयश आले. मात्र, आपण सर्वजण लोकशाहीतील उच्च अधिकार असणाऱ्या मतांचे शस्त्र घेऊन खंबीरपणे माझ्या पाठीशी राहणार हा विश्वासही बजरंग सोनवणे यांनी या वेळी व्यक्त केला.

बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावर जात नगद नारायण महाराज यांची समाधी तसेच गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचेही दर्शन घेतले. याबरोबरच श्री क्षेत्र नवगण राजुरीला जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. आष्टी व गेवराई तालुक्याचा दौरा त्यांनी पूर्ण केला असून, लोकसभेच्या (LokSabha) निवडणुकीला सामोरे जाताना विजयासाठी नक्की काय रणनीती आखायची याचे नियोजन सोनवणे यांनी सुरू केले आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

R

Bajrang Sonwane
Jitendra Awhad News : दोघे महाराष्ट्राचे दादा, युद्धात जिंकले, पण तहात हरले! आव्हाडांनी डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com