Beed Political News : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकजा मुंडे Pankaja Munde यांना तर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले आहे. बीडची लढत दुहेरी होणार, असे वाटत असतानाच वंचितनेही या मतदारसंघात इंटरेस्ट दाखवला.
दरम्यान, ही लोकसभा निवडणूक लढवण्यास शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे Vinayak Mete यांच्या पत्नी ज्योती मेटे इच्छुक आहेत. वंचितच्या वतीने त्यांनाच गळ घातल्याची माहिती आहे. यावर मात्र ज्योती मेटे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मेटे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर बीडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. Vanchit Contest Jyoti Mete in Beed Lok Sabha Constituency.
भाजपने राज्यातील पहिल्या यादीत बीडमधून Beed पंकजा मुंडेंचे नाव जाहीर करून निवडणुकीच्या तयारीत बाजी मारली. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटात सहभागी झालेले बजरंग सोनवणेंनी शरद पवार गटात सहभागी झाले. दरम्यान, ज्योती मेटेंनी Jyoti Mete निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली होती.
ज्योती मेटे यांनी शरद पवारांची Sharad Pawar भेट घेतली होती. त्यामुळे मेटे या शरद पवार गटाकडून पंकजा मुंडेंना आव्हान देणार अशी चर्चा झाली. मात्र पवारांनी सोनवणेंना रिंगणात उतरवले. त्यानंतरही मेटे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्या. त्या अपक्ष निवडणूक लढवणार, असे बोलले जात होते. त्यासाठी त्यांची शिवसंग्राम संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू आहेत. यातच त्यांना वंचितने ऑफर दिल्याची माहिती आहे. यावर मात्र मेटेंनी जाहीरपणे बोलणे टाळले आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने बीड मतदारसंघातील आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यावेळी भाजपच्या प्रीतम मुंडे Pritam Munde या सहा लाख 78 हजार 175 मते घेऊन निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी पाच लाख नऊ हजार 807 मते घेतली होती. तर वंचितचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव 92 हजार 139 मते घेत तिसऱ्या क्रमांकवर राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या निवडणुकीत ज्योती मेटे वंचितकडून लढल्या तर मुंडेंसह सोनवणेंचीही डोकेदुखी वाढणार आहे. मराठा आंदोलनाचे केंद्र मराठवाडा बनले आहे. शिवसंग्राम संघटनेनेही मराठा समाजासाठी Maratha मोठे काम केले आहे. त्या कामाची पावती म्हणून मेटेंना समाजाचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. तसेच वंचितची मोठी ताकदही पाठी येणार असल्याचे मेटे बीडमधून गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.