Beed News: बीडमध्ये नवीन ट्विस्ट; सोनवणे, मेटेंच्या उमेदवारीचा वाटेत 'निष्ठावंतांचा' स्पीड ब्रेकर

Beed Lok Sabha Election 2024: निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याचा ठराव, बजरंग सोनवणे व डॉ. ज्योती मेटे यांच्या वाटेत स्पीड ब्रेकर घातला आहे. शरद पवार कसा तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Beed Lok Sabha Election 2024:
Beed Lok Sabha Election 2024:Sarkarnama
Published on
Updated on

Ambajogai (Beed): राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना मागे टाकत या स्पर्धेत पुढे गेलेल्या बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) व डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या वाटेत देखील आता 'निष्ठावंतांचा' स्पीड ब्रेकर आला आहे. त्यामुळे नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या व महिनाभरापासून 'बीडला हवा चेहरा नवा' असा नारा देत तयारी करत असलेल्या डॉ. नरेंद्र काळे यांच्या पुढाकाराने केज -अंबाजोगाची पक्षाची सहविचारसभा झाली. बैठकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव संमत करण्यात आला.

बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्या पक्षातील एन्ट्रीने केज मतदार संघातील मुळ पदाधिकारी देखील धास्तावलेले आहेत. सोनवणे यांचा राजकीय राबता केज तालुका असल्याने आता संघटनेत देखील बदल होण्याची भीती असल्याने 'केज व अंबाजोगाईच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदल करू नये' असा ठराव देखील संमत करण्यात आला आहे.

बैठकीत पक्षाचे केज विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश चामनर, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, बन्सी जोगदंड, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, अंबाजोगाई शहराध्यक्ष शहाजहान पठाण आदींच्या या ठरावावर स्वाक्षऱ्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Beed Lok Sabha Election 2024:
Udayanraje Bhosale News : अखेर ठरलं! उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार!

बैठकीत पृथ्वीराज साठे, डॉ. काळे, सुरेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यात आगामी लोकसभेसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारांशी व पक्षाशी निष्ठा असलेल्या व्यक्तीलाच बीड लोकसभा व केज विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी असा सुर निघाला, तसा ठरावही घेण्यात आला. त्याच बरोबर केज व अंबाजोगाई तालुक्यातील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी निवडी नुकतीच झालेली आहे. पक्षाच्या घटनेनुसार त्यांचा कार्यकाल संपल्याखेरीज त्यांना पदावरून दूर करू नये असाही ठराव या बैठकीत झाला.

हे लेखी ठराव पक्षाकडे पाठविण्यात आल्याचे डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. नरेंद्र काळे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे आदी इच्छुक आहेत. काहींचे जिल्ह्यात दौरे देखील सुरु असतानाच शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे व बजरंग सोनवणे यांची नावे उमेदवारीसाठी स्पर्धेत आली. बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात करावेस देखील केला. प्रवेशाच्या दिवशीच ही बैठक नियोजित होती. मात्र, अचानक बैठक रद्द करावी लागली. आता बैठक घेत पदाधिकाऱ्यांनी 'निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या' असा सूर आळवीत बजरंग सोनवणे व डॉ. ज्योती मेटे यांच्या वाटेत स्पीड ब्रेकर घातला आहे. आता यावर शरद पवार कसा तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com