Udayanraje Bhosale News : अखेर ठरलं! उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार!

Satara Lok Sabha Constituency : दिल्लीतील बैठकीनंतर अमित शाह यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले
Udayanraje Bhosale on Retirement
Udayanraje Bhosale on Retirement Sarkarnama

Loksabha Election 2024 सातारा लोकसभेसाठी भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब  केले. साताऱ्यातून उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सुरु असलेला तिढा शनिवारी रात्री उशिरा सुटला आहे. सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते.  केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट मिळावी यासाठी गेली तीन दिवस वाट पाहत होते. मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ते सातारा लोकसभेची भाजपकडून उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी करणार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale on Retirement
Loksabha Election 2024 News : श्रीनिवास पाटील करणार विजयाची पुनरावृत्ती की उदयनराजे घेणार बदला ..?

आज (शनिवारी) भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत होणार होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते.

रात्री उशीरा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. जवळपास अडीच तास बैठक चालली. या बैठकीत सात राज्याच्या जागांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्री अमित शाह यांचं निवासस्थान असलेल्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी बैठक झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार उदयनराजे भोसले या पाच नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह, उदयनराजे भोसले, अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.अखेर अमित शाह(Amit Shah) यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने अखेर उदयनराजेंसाठी सातारा मतदारसंघावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा सांगूनही ही जागा भाजपला ठेवण्यात यश मिळवले. आता रविवारी भाजपची विविध सात राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.

Udayanraje Bhosale on Retirement
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक फक्त ट्रेलर, खरा पिक्चर तर...; पवारांना साथ देताच जुन्या मित्राचा भाजपला इशारा

आता सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटील अशी लढत होणार आहे. सातारा लोकसभेची ही निवडणूक केंद्रीय मंत्री अमित शाह व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

तसेच या निवडणुकीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मतदार उदयनराजेंचे काम करणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ देणार याची उत्सुकता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com