Dhananjay Munde: 'आपण मॅनेज नाही' असं समोरच्या उमेदवाराला...; मुंडेंचा सोनवणेंवर हल्लाबोल

Dhananjay Munde On Bajrang Sonwane: "सध्या जातीपातीचे राजकारण केले जात आहे, पण या जिल्ह्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समोरचे मात्र खालच्या पातळीवर जाऊन जाती-धर्मावर बोलत आहेत. परंतु तुम्हा त्यांना थारा देऊ नका."
Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Dhananjay Munde, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed Lok Sabha Election 2024: समोरच्या उमेदवाराला 'आपण मॅनेज नाही' असं शपथ घेऊन सांगावं लागत आहे. विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे. आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला.

परंतु, समोरचा उमेदवार मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र ते सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार? अशा शब्दात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर टीकास्र डागलं.

देशातील लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आलं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारादरम्यान विरोधी उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

त्यानंतर त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली. या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभेत बोलतान मुंडे म्हणाले, जातपात काहीच न पाहता या जिल्ह्यातील जनतेने अनेकांना संसदेत पाठविले आहे. घरातला पालक म्हणून मी या निवडणुकीकडे पाहतो. हा जिल्हा कर्तबगार माणसांना निवडूण देणारा आहे. आज तीच वेळ आली आहे.

सध्या जातीपातीचे राजकारण केले जात आहे, पण या जिल्ह्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समोरचे मात्र खालच्या पातळीवर जाऊन जाती-धर्मावर बोलत आहेत. परंतु तुम्हा त्यांना थारा देऊ नका, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं.

Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde Vs Bajrang Sonnwane : कोट्यधीश उमेदवार; पण सरस कोण ठरणार?

विरोधी उमेदवार बहुरंगी आहे

तसेच यावेळी मुंडे यांना सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. समोरच्या उमेदवाराला 'आपण मॅनेज नाही ' असं शपथ घेऊन सांगावं लागत आहे. विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे असं म्हणत त्यांनी सोनवणे यांच्या शेतकरी पुत्र असल्याच्या विधानावर टीका केली.

तसेच आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला, समोरचा उमेदवार आरक्षण आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र हे सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार? असा प्रश्नदेखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

बहीण-भावांनी कारखाने बंद केले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. पालकमंत्री महोदय तुम्ही आमची औकात काढू नका. आमची औकात काय आहे, हे आम्ही दाखवून दिलेले आहे.

गोपीनाथराव मुंडेंनी राज्यातील 25 साखर कारखाने यशस्वीपणे चालविले. तुम्ही बहीण-भावांनी हे कारखाने बंद केले. त्यांनी काढलेले तीन साखर कारखाने देखील बंद पाडले, असं म्हणत सोनवणे यांनी मुंडेंना डिवचलं होतं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com