Beed News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत बीडचा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स वाढला आहे. मात्र, उमेदवारीच्या शर्यतीत शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) आणि पक्षातील नेते बजरंग सोनवणे ( Bajrang Sonawane) यांच्यात शर्यत आहे. आता उमेदवारी जरी मिळाली नाही तरी आपण निवडणुकीत उभे राहणारच, असा निर्धार ज्योती मेटे यांनी व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election 2024)
आज बीड येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ज्योती मेटे म्हणाल्या, "दिवंगत विनायक मेटे यांच्यानंतर आता मी बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे संघटनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांना वाटत आहे. निवडणूक लढण्याबाबत शरद पवार यांनी विचारना केली असता, आम्ही या निर्णयाप्रती पुढे गेलो आहोत. निवडणुकासंदर्भात चांगली चर्चा सुरू आहे. शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या निर्णयाने मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मेटे म्हणाल्या, "माझं नाव उमेदवारांच्या यादीत असेल की नाही हे पक्ष ठरवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जर उमेदवारी दिली गेली नाही, तरीही माझ्या शिवसंग्राम संघटनेकडून निवडणूक लढवणार आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून अंतिम निर्णय ठरवणार आहे. मी आता फक्त बीडमधून (Beed) निवडणूक लढण्यास इच्छुक आहे."
"मला बीडच्या जनतेने समाजकारणात-राजकारणात पुढे आणले आहे. कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी ज्योती मेटे या बीडमधून उमेदवार असणार आहेत, मराठा-ओबीसी असं काही संघर्ष इथे नाही. मी या ठिकाणी जातींचे राजकारण करणार नाही," असेही ज्योती मेटे (Jyoti Mete) म्हणाल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.