Beed Lok Sabha Election 2024 : बजरंग सोनवणे की ज्योती मेटे, बीडमध्ये कोणाची ताकद जास्त?

Bajrang Sonwane Vs Jyoti Mete : बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर ज्योती मेटेसुद्धा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा आहे.
Bajrang Sonwane Jyoti Mete
Bajrang Sonwane Jyoti Mete sarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) उमेदवार कोण? याचा सस्पेन्स वाढला आहे. मात्र, उमेदवारीच्या शर्यतीत शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) यांना मागे टाकत बजरंग सोनवणे ( Bajrang Sonawane) पुढे गेल्याची माहिती आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून ( Beed Lok Sabha Election 2024 ) भाजपने सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांची उमेदवारी टाळत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना रिंगणात उतरवले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) देखील बीडची निवडणूक 'टफ' होईल अशी बांधणी करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी गृहीत धरून तयारी करणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून भाजपने पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे तोडीचा उमेदवार देण्याची रणनीती पवार आखत आहेत. बीडची निवडणूक चौथ्या टप्प्यात असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वेळ तर मिळालाच आहे. पण, उमेदवारीसाठी चांगले पर्यायदेखील उपलब्ध होत आहेत. अगोदर पक्षाकडून डॉ. नरेंद्र काळे, माजी मंत्री जयसिंग गायकवाड, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे हे इच्छूक असतानाच शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे, बजरंग सोनवणे, बी. बी. जाधव, डॉ. अशोक थोरात असे पर्याय पक्षासमोर आले.

यात शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांचे नाव आघाडीवर होते. दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी मराठा समाजाचे आरक्षण, मुस्लिम समाजाचे आरक्षण, धनगर आरक्षण या मुद्द्यासह सामाजिक चळवळीत कायम सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा मृत्यूदेखील मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जाताना वाहन अपघातात झालेला आहे. इतर सर्वच समाजात दिवंगत मेटे यांच्याबद्दल असलेला आदर व सहानुभूती याचा फायदा डॉ. ज्योती मेटे यांना होऊ शकतो. तसेच महिला उमेदवार आणि प्रशासनात कामाचा व दिवंगत मेटे यांच्या पश्चात संघटनेत कामाचा अनुभव त्यांना आहे.

Bajrang Sonwane Jyoti Mete
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी नगरमधील ‘मावशी’ बीडच्या मैदानात उतरणार

मात्र, बुधवारी बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. दोन साखर कारखाने चालविणारे बजरंग सोनवणे यांनी मागच्या वेळेस भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचीही जिल्हाभर ओळख आहे. निवडणूक लढविण्याचे तंत्र, साम-दाम-दंड भेद वापरण्याची क्षमता, या बाबीमुळे आता बजरंग सोनवणे यांचे नाव आघाडीवर आले आहे. पक्षातील एका फळीने बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात वजन टाकत ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

डॉ. ज्योती मेटे यांच्यापेक्षा निवडणुकीतले आर्थिक गणित आणि सक्षमपणे यंत्रणा राबविण्याची क्षमता बजरंग सोनवणे यांच्याकडे असल्याचा युक्तिवाद एक गट सातत्याने करत आहे. त्यामुळे त्यांचे नाव आता आघाडीवर आले आहे. प्रवेशाच्या कार्यक्रमात बजरंग सोनवणे यांनी मागच्या निवडणुकीचे गणित मांडत आपण उमेदवारीसाठी सक्षम व इच्छूक असल्याचे अधोरेखित केले आहे. आता शरद पवार कोणती खेळी करतात हे पाहावे लागेल.


( Edited By : Akshay Sabale )

R

Bajrang Sonwane Jyoti Mete
Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये सत्ताधारी-विरोधकात शिमगा; आरोप- प्रत्यारोपांची धुळवड!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com