Beed Lok Sabha Election 2024 Result : बीडमध्ये 'पिपाणी'ने वाढवले, 'तुतारी'चे टेन्शन; वंचितपेक्षाही मिळाली अधिक मते

Pankaja Munde Vs Bajrang Sonavne News : मतदारांनी भरभरुन मतदान केले मात्र, काही जणांनी तुतारी चिन्ह समजून अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीला मतदान केले. त्यामुळे सोनवणे यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
Beed Loksabha Constituency
Beed Loksabha Constituency Sarkarnama

Beed lok Sabha News : चिन्हातील साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराच्या पिपाणी चिन्हाचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना बसला. मतदारांनी भरभरुन मतदान केले मात्र, काही जणांनी तुतारी चिन्ह समजून अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीला मतदान केले. त्यामुळे सोनवणे यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

बीडमधील मतमोजणीवेळी 21व्या फेरीपर्यंत बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) हे 34 हजार मतांनी पिछाडीवर होते. याच वेळी उमेदवार अशोक थोरात यांच्या पिपाणी चिन्हावर त्याहून अधिक मतदान झाले आहे. विशेष म्हणजे वंचितच्या अशोक हिंगे यांच्यापेक्षा अधिक मते अपक्षाला मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे आता निकाल काय, लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) बजरंग सोनवणे यांच्यात अटातटीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या दोन प्रमुख उमेदवारासोबतच वंचितकडून अशोक हिंगे रिंगणात होते. आता मतमोजणीत समोर येणाऱ्या आकडेवारी टेन्शन वाढविणारी ठरत आहे.

आघाडी घेतलेल्या पंकजा मुंडेंचे मताधिक्क्य 21 व्या फेरीला 34 हजारांहून अधिक आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस अशा चिन्हाशी साधर्म्य असणाऱ्या पिपाणीला प्रत्येक फेरीत साधारण दोन हजार मते मिळत आहेत.

अगोदरच पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यातील आघाडी-पिछाडीच्या खेळामुळे दोघांचे समर्थक टेन्शनमध्ये होते. परंतु, आता पिपाणीने तुतारी समर्थकांचे टेन्शन वाढविले आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 41उमेदवार आणि एक नोटा असे 42 उमेदवार झाले. त्यामुळे तीन मतदान यंत्र केंद्रांत बसवावे लागले. प्रमुख उमेदवार पंकजा मुंडे यांचे चिन्ह पहिल्या मशिनच्या पहिल्या क्रमांकावर होते. तर, बजरंग सोनवणे यांचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर होते. तर चौथ्या क्रमांकावर अशोक थोरात यांचे पिपाणी हे चिन्ह होते.

ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नसल्याचे दिसते. त्यामुळे पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे वंचितच्या अशोक हिंगे यांच्यापेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत. 22 व्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांचे लीड 38 हजारांचे झाले आहे.

(Edited By : Sachin Waghmare )

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com