Beed Lok Sabha election 2024: पंकजा मुंडे यांच्यासमोर नवं आव्हान; यशवंत सेनेनं दंड थोपटले...

Pankaja Munde Vs Balasaheb Dodtale:भाजप आणि मुंडे भगिनी विरोधात धनगर बांधवांनी एल्गार पुकारला आहे. संभाजीनगरमध्ये मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, असा निर्धार बैठकीतील नेत्यांनी केला आहे.
Beed Lok Sabha election 2024
Beed Lok Sabha election 2024Sarkarnama
Published on
Updated on

भाजपने सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha 2024) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच बीडमधून यशवंत सेनेने दंड थोपटले आहे.

यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. धनगर समाजाचे नेते, आरक्षणासाठी बीड, चौंडी, मुंबईत आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतले (Pankaja Munde Vs Balasaheb Dodtale) यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत, असे जाहीर करण्यात आले. यशवंत सेनेची बीडमध्ये नुकतीच बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने धनगर बांधवांवर अन्याय केला आहे. त्यांनी अवघ्या पाच जागांवर धनगर समाजाचे उमेदवार उभे केले आहेत. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार नाही, अशाच ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील त्यांनी सोडला नाही. तर दुसरीकडे मुंडे भगिनींना आतापर्यंत आम्ही निवडून दिले. मात्र त्यांनी देखील संसदेत धनगर बांधवांचा मुद्दा लावून धरला नाही, त्यामुळे भाजप आणि मुंडे भगिनी विरोधात धनगर बांधवांनी एल्गार पुकारला असून संभाजीनगरमध्ये मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, असा निर्धार बैठकीतील नेत्यांनी केला आहे.

Beed Lok Sabha election 2024
Supriya Sule News: अजितदादांबद्दल सुप्रियाताईंचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या, ही माझी चूक झाली का?

२०१९ विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राजकीय संन्यास भोगावा लागला. भाजपच्या दुसऱ्या यादीत पंकजा यांचं बीड लोकसभेसाठी नाव जाहीर करण्यात आले. उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम यांच्यासह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही, मी ५ वर्ष वाट पाहिली, त्यांना तेवढी वाट बघावी लागणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड लोकसभेसाठी भाजपने पंकजा मुंडेंना रिंगणात उतरले आहे. आता त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी देखील व्युव्हरचना आखली असल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी, आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात असलेली धग आणि इतर मुद्द्यांचा लाभ उठू शकणारा व जिल्हाभरात स्वतंत्र ओळख आहे असा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून शोधला जात आहे. या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी काही प्रमुख नेत्यांना संपर्क देखील साधल्याचे सूत्रांची माहिती आहे. यात प्रामुख्याने शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती विनायक मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, आरक्षण आंदोलन आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी. बी. जाधव आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची नावे आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com